Adani Transmission: अदानी समूहासाठी गूड न्यूज, अदानी ट्रान्समिशनने केली अचाट कामगिरी

Adani Share Price: हिंडेनबर्ग संशोधन अहवाल समोर आल्यानंतर गौतम अदानी यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये.
Gautam Adani | Adani Group
Gautam Adani | Adani Group Dainik Gomantak

Adani Transmission: हिंडेनबर्ग संशोधन अहवाल समोर आल्यानंतर गौतम अदानी यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स सातत्याने लोअर सर्किटमध्ये अडकत आहेत. त्यामुळे अदानी समूहाच्या बाजारमूल्यात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे.

मात्र, यादरम्यान अदानी समूहाबाबत (Adani Group) एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. खरे तर, अदानी ग्रुपची कंपनी अदानी ट्रान्समिशनने त्यांचा तिमाही निकाल जाहीर केला आहे, या निकालांवर नजर टाकल्यास, अदानी ट्रान्समिशनने उत्कृष्ट नफा नोंदवला आहे.

अदानी ट्रान्समिशन

अदानी ट्रान्समिशनने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालांमध्ये अदानी ट्रान्समिशनच्या नफ्यात 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत अदानी समूहाची कंपनी अदानी ट्रान्समिशन लिमिटेड (ATL) चा एकात्मिक निव्वळ नफा सुमारे 73 टक्क्यांनी वाढून 478 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एकरकमी उत्पन्न आणि महसुलात वाढ झाल्यामुळे कंपनीचा नफाही वाढला आहे.

Gautam Adani | Adani Group
Gautam Adani: श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींची मोठी घसरण, आता 'या' स्थानावर पोहोचले

अदानी ग्रुप

याआधी गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने 277 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. या कालावधीत, एटीएलचे एकात्मिक उत्पन्न देखील 2,623 कोटी रुपयांवरुन 3,037 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

अदानी ट्रान्समिशन ही देशातील सर्वात मोठी खाजगी ट्रान्समिशन कंपनी आहे. या कंपनीचा व्यवसाय भारतातील 13 राज्यांमध्ये आहे. दुसरीकडे, सोमवारी कंपनीचा शेअर लोअर सर्किटवर बंद झाला.

Gautam Adani | Adani Group
Gautam Adani: 'मला इतकं प्रसिद्ध केलं की...', राहुल गांधींच्या आरोपांवर गौतम अदानी म्हणाले

अदानी ट्रान्समिशनच्या शेअरची किंमत

अदानी ट्रान्समिशनच्या शेअरची (Share) किंमत गेल्या अनेक दिवसांपासून लोअर सर्किटमध्ये आहे. सोमवारी, 6 फेब्रुवारीलाही अदानी ट्रान्समिशनच्या स्टॉकमध्ये लोअर सर्किट दिसून आले. NSE वर अदानी ट्रान्समिशनचा शेअर 139.60 अंकांनी घसरुन 1256.45 वर बंद झाला.

समभागाची 52 आठवड्यांची उच्च किंमत 4236.75 रुपये आहे. तर त्याची 52 आठवड्यांची सर्वात कमी किंमत 1256.45 रुपये आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com