आधार, डिजिलॉकर आणि आयुष्मान भारतचा डाटा सुरक्षित, केंद्र सरकारने फेटाळला मूडीज इन्व्हेस्टरचा दावा

Government Rejects Moody's Investor's Claim: केंद्र सरकारने नागरिकांना आश्वासन दिले आहे की "इंडिया स्टॅक" अंतर्गत आधार प्रणाली सायबर हल्ल्यांपासून अत्यंत सुरक्षित आहे. सरकार नागरिकांच्या डेटाची सुरक्षा आणि गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
Aadhaar, DigiLocker and Ayushman Bharat data safe, central government rejects Moody's Investor's claim.
Aadhaar, DigiLocker and Ayushman Bharat data safe, central government rejects Moody's Investor's claim.Dainik Gomantak
Published on
Updated on

Aadhaar, DigiLocker and Ayushman Bharat data safe, central government rejects Moody's Investor's claim: आधारच्या सुरक्षिततेबद्दल मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेसने उपस्थित केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, सरकारने म्हटले आहे की केवळ बायोमेट्रिक बायोमेट्रिक सिटीझन आइडेंटिटी सिस्टम प्रणालीच नाही तर "इंडिया स्टॅक" अंतर्गत सर्व अ‍ॅप्स सायबर हल्ल्यांपासून अत्यंत सुरक्षित आहेत, तरीही देशात दररोज सायबर हल्ल्यांचे प्रयत्न होत आहेत.

आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचे सीईओ आणि एमडी अभिषेक सिंग म्हणाले की, प्रणाली सुरक्षित आणि संरक्षित असल्यामुळे सरकार-व्यवस्थापित सेवांवर नागरिकांचा विश्वास आहे.

“आधार प्रणालीचा सुरक्षा आणि गोपनीयता असामान्य आहे. नागरिकांचा डेटा आणि आधार प्रणाली सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न सर्वांसमोर येत नाहीत, कारण आतपर्यंत कोणताही मोठा सायबर हल्ला होऊ शकला नाही.

सिटीबँकेने त्यांचा डेटा गमावला, किंवा लिंक्डइनने डेटा गमावला किंवा मोठ्या कंपन्या त्यांचा डेटा गमावल्याबद्दल आपण सतत ऐकत असतो. पण आधार डेटा पूर्णपणे सुरक्षित असल्याने अशा कोणत्याही घटना आधार प्रणालीशी घडल्या नाहीत.” असे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचे सीईओ आणि एमडी अभिषेक सिंग म्हणाले.

Aadhaar, DigiLocker and Ayushman Bharat data safe, central government rejects Moody's Investor's claim.
'Gen Z'च्या पाकिटावर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टचा डोळा, तरुण ग्राहकांसाठी दोन्ही कंपन्यांच्या पायघड्या

सिंग पुढे म्हणाले की, यंत्रणा सुरक्षित राहावी यासाठी सरकार खूप प्रयत्न करत आहे. “पुढील हल्ला होईपर्यंत आपला डाटा सुरक्षित आहे, कारण आपल्या सिस्टीमवर होणारे हल्ले कदाचित जगातील सर्वात जास्त आहेत.

आपली आधार प्रणाली आणि इंडिया स्टॅक सुरक्षित राहावे म्हणून 24x7 झटणारे CERT-In चे अभियंते आणि इतरांचे करावे इतके कौतुक कमी आहे.

ते म्हणाले की, यंत्रणेतील असुरक्षा तपासण्यासाठी नियमित अंतराने सुरक्षा ऑडिट केले जातात. कारण कोणत्याही सॉफ्टवेअर सिस्टममध्ये कधी कोणतीही अडचण निर्माण होऊ शकते.

Aadhaar, DigiLocker and Ayushman Bharat data safe, central government rejects Moody's Investor's claim.
क्लेम रिजेक्शनला बाय बाय! EPFO च्या निर्णयामुळे पीएफ धारकांची फरफट थांबणार

डिजिलॉकर अ‍ॅपचे सध्या 20 कोटी वापरकर्ते आणि सहा अब्ज कागदपत्रे आहेत. “परंतु सर्व डेटा एकाच ठिकाणी साठवला जातो असे नाही. डेटाचा मालक असलेल्या डेटा फिड्युशियरीकडे डेटा खरोखर संग्रहित केला जातो."

सिंग म्हणाले, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत, आरोग्य नोंदी केंद्रीकृत डेटा सेंटरमध्ये ठेवल्या जात नाहीत, तर हॉस्पिटलच्या डेटा सेंटरमध्ये किंवा हॉस्पिटलद्वारे वापरल्या जाणार्‍या सेवा प्रदात्याकडे राहतात.

आणि जेव्हाही तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या नोंदींची आवश्यकता असेल, तेव्हा तुम्ही ते तुमच्या फोनवर किंवा तुमच्या डिव्हाइसवर तो मिळवण्यास सक्षम असाल आणि तुमच्या संमतीने ते एका खाजगी तृतीय पक्षाशी शेअर करू शकाल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com