8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

8th Pay Commission Fitment Factor Salary Calculation: 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 चा फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 7000 रुपयांवरुन थेट 18000 रुपये प्रतिमहिना झाले होते.
8th Pay Commission Fitment Factor Salary Calculation
8th Pay CommissionDainik Gomantak
Published on
Updated on

8th Pay Commission Salary: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग अत्यंत उत्सुकतेचा विषय ठरत आहे. आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी अजून काही कालावधी शिल्लक असला, तरी कर्मचाऱ्यांमध्ये पगारवाढीच्या आकड्यांबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या अंतिम वेतनात किती वाढ होणार, हे पूर्णपणे 'फिटमेंट फॅक्टर' या महत्त्वाच्या घटकावर अवलंबून असते. फिटमेंट फॅक्टर हा असा एक नंबर आहे, ज्याचा वापर करुन जुन्या मूळ वेतनाला गुणले जाते आणि त्याद्वारे नवीन सुधारित मूळ वेतन निश्चित केले जाते.

7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 चा फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 7000 रुपयांवरुन थेट 18000 रुपये प्रतिमहिना झाले होते. आता 8व्या वेतन आयोगात विविध फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास कर्मचाऱ्यांची मूळ वेतनरचना कशी बदलू शकते, याचा अंदाज बांधला जात आहे. जर सध्याचे किमान मूळ वेतन 18000 रुपये गृहीत धरले, तर 1.83 च्या फिटमेंट फॅक्टरनुसार ते 32940 रुपये, 2.0 च्या फॅक्टरनुसार 36000 रुपये, 2.57 नुसार 46260 रुपये, तर कामगार संघटनांच्या मागणीनुसार 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मूळ वेतन थेट 68940 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

8th Pay Commission Fitment Factor Salary Calculation
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर ते बेसिक पे... 8वा वेतन आयोग 7व्या आयोगापेक्षा कसा वेगळा? कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारे 5 मोठे बदल!

याच नियमानुसार इतर पे-लेव्हलमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनातही मोठा फरक दिसून येईल. लेव्हल 2 (सध्याचे मूळ वेतन 19900 रुपये) मधील कर्मचाऱ्यांचा पगार 1.83 फॅक्टरवर 36417 रुपये, तर 3.83 फॅक्टरवर 76,217 रुपये होऊ शकतो. लेव्हल 4 (25500 रुपये) मधील वेतन 1.83 च्या फॅक्टरवर 46665 रुपये आणि 3.83 च्या फॅक्टरवर 97665 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. लेव्हल 5 (29200 रुपये) साठी किमान 53436 रुपयांपासून कमाल 111863 रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते.

8th Pay Commission Fitment Factor Salary Calculation
8th Pay Commission: 'किमान पगार 72 हजार करा', सरकारी कर्मचाऱ्यांची आठव्या वेतन आयोगाकडे मोठी मागणी; पगारात 400 टक्के वाढ होणार?

उच्च पदांवरील कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास, लेव्हल 6 (35400 रुपये) चा पगार 2.57 च्या फॅक्टरवर 90,978 रुपये, तर 3.83 वर 13582 रुपये होऊ शकतो. लेव्हल 7 (44,900 रुपये) मधील वेतन 1.83 वर 82167 रुपये आणि 3.83 वर 1,71936 रुपये पोहोचेल. तसेच लेव्हल 10 (56100 रुपये) च्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 2.0 च्या फॅक्टरवर 112200 रुपये, तर 3.83 च्या फॅक्टरनुसार 214863 रुपये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

8th Pay Commission Fitment Factor Salary Calculation
8th Pay Commission: जुनी पेन्शन, 6% वार्षिक इन्क्रिमेंट अन् वाढीव HRA; 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा

कर्मचारी संघटनांनी 3.83 च्या फिटमेंट फॅक्टरची आक्रमक मागणी केली असली, तरी तज्ज्ञांच्या मते हा फॅक्टर 1.83 ते 2.57 च्या दरम्यान निश्चित केला जाऊ शकतो. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com