8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर ते बेसिक पे... 8वा वेतन आयोग 7व्या आयोगापेक्षा कसा वेगळा? कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारे 5 मोठे बदल!

8th Pay Commission Update: 8वा वेतन आयोग येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी राजस्थानची राजधानी जयपूर येथे आपली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करणार आहे.
8th Pay Commission Update
8th Pay CommissionDainik Gomantak
Published on
Updated on

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली. 8वा वेतन आयोग येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी राजस्थानची राजधानी जयपूर येथे आपली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करणार आहे. गेल्या काही महिन्यांत या आयोगाच्या पॅनेलने पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि लडाख यांसारख्या विविध राज्यांना भेटी देऊन स्टेकहोल्डर्सशी चर्चा केली.

न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला हा 8वा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन, विविध भत्ते आणि पेन्शनच्या (Pension) रचनेचा सखोल आढावा घेण्याचे काम करत आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये स्थापन झालेल्या या आयोगाकडून सुमारे 18 महिन्यांनंतर, म्हणजेच मे किंवा जून 2027 पर्यंत केंद्र सरकारला आपला अंतिम अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे.

8th Pay Commission Update
8th Pay Commission: 'किमान पगार 72 हजार करा', सरकारी कर्मचाऱ्यांची आठव्या वेतन आयोगाकडे मोठी मागणी; पगारात 400 टक्के वाढ होणार?

सध्या सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारक 'फिटमेंट फॅक्टर' आणि 'किमान वेतना'बाबत अधिकृत निर्णयाची वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर 7व्या वेतन आयोगाने केलेले बदल हे 8व्या वेतन आयोगाच्या आगामी शिफारशींचा अंदाज लावण्यासाठी एक मुख्य बेंचमार्क मानले जात आहेत. 7व्या वेतन आयोगाने जुनी 'पे बँड' आणि 'ग्रेड पे' रचना रद्द करुन 'पे मॅट्रिक्स' प्रणाली लागू केली होती. तसेच 2.57 चा फिटमेंट फॅक्टर वापरुन किमान मूळ वेतन 7000 रुपयांवरुन थेट 18,000 रुपये प्रतिमहिना केले होते. याशिवाय 197 भत्त्यांची समीक्षा करुन 53 भत्ते पूर्णपणे रद्द केले होते आणि 37 भत्ते इतर भत्त्यांमध्ये विलीन करुन एचआरए रचनेत मोठे बदल केले होते.

8th Pay Commission Update
8th Pay Commission: पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्यांना लागणार मोठी लॉटरी; पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ?

आता 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. BPMS, NC(JCM), आणि AIDEF यांसारख्या प्रमुख कामगार संघटनांनी नवीन वेतनासाठी 3.5 ते 4 पट फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची आक्रमक मागणी केली. सरकारने ही मागणी विचारात घेतल्यास कर्मचाऱ्यांचे बेसिक पे आणि पे मॅट्रिक्समधील वेतनात मोठी वाढ पाहायला मिळू शकते. मूळ वेतनासोबतच एचआरए, ट्रान्सपोर्ट अलाउन्स आणि इतर फायद्यांमध्येही सकारात्मक सुधारणा अपेक्षित आहेत. तसेच वार्षिक वेतनवाढीचा सध्याचा 3 टक्के दर कायम ठेवला जातो की त्यात काही नवीन बदल केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

8th Pay Commission Update
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

एकंदरीत, वेतन आयोगाची सुधारणा ही केवळ 'फिटमेंट फॅक्टर'पुरती मर्यादित नसून मूळ वेतन, पे मॅट्रिक्स पातळी, भत्ते आणि वार्षिक वाढ या सर्वांवर अवलंबून असते. आगामी जयपूर, चंदीगड, पुदुचेरी आणि चेन्नई येथील बैठकांमध्ये कामगार संघटना आणि स्टेकहोल्डर्स आपली मते मांडतील, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचे आणि पेन्शनचे अंतिम चित्र अधिक स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com