7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली थकबाकीची मोठी भेट, आता भरावा लागणार नाही कर!

7th Pay Commission DA Arrears: तुमचे आयकर रिटर्न भरण्यापूर्वी, तुम्ही DA थकबाकी रकमेवर कर कसा वाचवू शकता हे जाणून घेतले पाहिजे.
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

7th Pay Commission Update: देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्हीही सरकारी नोकरी करत असाल आणि तुम्हाला थकबाकीचे पैसे मिळाले असतील, तर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार पगार घेणारे सर्व कर्मचारी कर सवलतीचा लाभ घेऊ शकतात. तुमचे आयकर रिटर्न भरण्यापूर्वी, तुम्ही DA थकबाकी रकमेवर कर कसा वाचवू शकता हे जाणून घेतले पाहिजे.

कर सवलतीचा लाभ मिळेल

सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना (Employees) कलम 89 अंतर्गत थकबाकीवर कर सूट मिळू शकते. तुम्ही कर सवलतीसाठी दावा करु शकता. कर सवलतीचा दावा करण्यासाठी तुम्हाला ई-फायलिंग वेबसाइटवर फॉर्म 10E भरणे आवश्यक आहे.

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता, 10 दिवसांनी वाढणार DA! आता किती वाढ होणार माहीत आहे?

महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढतो

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ केली जाते, ज्याअंतर्गत त्यांना डीएच्या थकबाकीचे पैसे मिळतात. सरकार जानेवारी आणि जुलै महिन्यांतील डीए थकबाकीचे आकडे बदलते.

यावेळीही सरकार (Government) महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करु शकते. त्यामुळे सरकारी कर्मचारी या थकबाकीच्या रकमेवर करमाफीचा दावा करु शकतात. डीएची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते.

तज्ञांचे मत काय आहे?

तज्ञांच्या मते, जर तुम्ही कलम 89 अंतर्गत कराचा दावा केला तर तुम्हाला प्रथम फॉर्म 10E भरावा लागेल. तुम्ही या फॉर्मशिवाय दावा केल्यास तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते, त्यामुळे असे करणे टाळा.

Money
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज, महागाई भत्त्यात तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ!

ते नोटीसमध्ये लिहिले जाईल

प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या नोटीसमध्ये, असे कळवले जाईल की तुम्हाला कलम 89 अंतर्गत सवलत देण्यात आलेली नाही कारण फॉर्म 10E दाखल केला गेला नाही.

फॉर्म 10E कसा सबमिट करायचा-

>> सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट http://www.incometax.gov.in वर क्लिक करावे लागेल.

>> त्यानंतर ई-फाइल > इन्कम टॅक्स फॉर्म > फाईल इन्कम टॅक्स फॉर्म वर क्लिक करा.

>> आता येथे तुम्हाला 10E फॉर्म दिसेल. आता तुम्हाला त्यात वर्ष निवडायचे आहे.

>> आता सर्व तपशील भरल्यानंतर सबमिट वर क्लिक करा आणि नंतर प्रिव्यू वर क्लिक करा.

>> आता Proceed to e-Verify वर क्लिक करा. यानंतर तुमच्या समोर ई-व्हेरिफिकेशन पेज उघडेल.

>> ई-व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मेसेज मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com