7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या प्रतिक्षेत आहेत. तर दुसरीकडे, देशातील अनेक राज्यांमध्ये वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी डीए आणि डीआर वाढवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत ओडिशानंतर आता हरियाणा आणि तामिळनाडूनेही महागाई भत्त्यात वाढ केली आहे.
काही दिवसांपूर्वीच, ओडिशा (Odisha) सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ केली. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आता 42 टक्के झाला आहे, जो पूर्वी 39 टक्के होता. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील सुमारे 7.5 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
या एपिसोडमध्ये आता हरियाणा आणि तामिळनाडू सरकारनेही (Government) घोषणा केली आहे. या राज्य सरकारांच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) वाढवण्यात आला आहे. हरियाणा आणि तामिळनाडू सरकारने 1 जानेवारी 2023 पासून डीएमध्ये 4 टक्के वाढ, मूळ वेतनाच्या 38 टक्क्यांवरुन 42 टक्के करण्याची घोषणा केली आहे.
त्याचवेळी, केंद्रीय कर्मचारी जुलै महिन्याच्या सहामाहीतील महागाई भत्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. डीएमध्ये 3 ते 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुमारे 47.58 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा फायदा होईल. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.