Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो निओचा नवा अवतार लवकरच बाजारात; जाणून घ्या बदललेले डिझाइन, फीचर्स आणि संभाव्य किंमत

Mahindra Bolero Neo Facelift: भारतीय ऑटोमोबाइल बाजारात लवकरच नवीन 2025 महिंद्रा बोलेरो निओ फेसलिफ्ट लॉन्च होण्यासाठी सज्ज झाली आहे.
Mahindra Bolero Neo Facelift
Mahindra BoleroDainik Gomantak
Published on
Updated on

Mahindra Bolero Neo Facelift: भारतीय ऑटोमोबाइल बाजारात लवकरच नवीन 2025 महिंद्रा बोलेरो निओ फेसलिफ्ट लॉन्च होण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही नवीन एसयूव्ही टेस्टिंगदरम्यान अनेकदा दिसली आहे. टेस्टिंगदरम्यान जरी तिचा पुढील भाग झाकलेला असला तरी इतर अनेक डिझाइन तपशील समोर आले आहेत. ही नवीन बोलेरो निओ सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक आकर्षक आणि आधुनिक फीचर्ससह येणार असल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

नवीन महिंद्रा बोलेरो निओमध्ये काही महत्त्वाचे बाह्य बदल दिसून येणार आहेत. यामध्ये नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स आणि बदललेली ग्रिल असण्याची शक्यता आहे, ज्यात अधिक स्लॅट्स असतील. सध्याच्या मॉडेलमधील डिझाइन घटक जसे की, हेडलॅम्प्स आणि फॉग लॅम्प्स, मागील टेललॅम्प्स, टेलगेटवर लावलेले अतिरिक्त व्हील्स आणि हाय-माउंटेड स्टॉप लाईट हे तसेच ठेवले जाण्याची शक्यता आहे. व्हील्सचा आकार (अलॉय साईज) आणि टायर प्रोफाईलमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. हे बदल बोलेरो निओला नवीन आणि आकर्षक लूक देतील, ज्यामुळे ती बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्यास मदत करेल.

Mahindra Bolero Neo Facelift
Mahindra Thar SUV: आधुनिक आणि दमदार! नवीन महिंद्रा थार लवकरच बाजारात; डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठे बदल

मोठे बदल आणि खास फीचर्स

नवीन बोलेरो निओच्या बाह्य डिझाइनमध्ये किरकोळ बदल असले तरी तिच्या केबिनच्या आत अनेक मोठे बदल अपेक्षित आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार आणि इतर कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महिंद्राने यात अनेक आधुनिक फीचर्सचा समावेश केला आहे. नवीन 2025 महिंद्रा बोलेरो निओ फेसलिफ्टमध्ये मोठा 10.2 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सारखे फिचर दिले जातील.

तसेच, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी व्हेंटिलेटेड सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस चार्जिंग पॅड यांसारखी प्रीमियम फीचर्स देखील दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच, पुश-बटन स्टार्ट आणि कीलेस गो सिस्टीम यांसारखे फिचर्सही यात समाविष्ट केले जाऊ शकतात, जी गाडी वापरणे अधिक सोपे बनवतील. हे सर्व फीचर्स बोलेरो निओला तिच्या सेगमेंटमधील इतर गाड्यांच्या तुलनेत अधिक स्पर्धात्मक बनवतील.

Mahindra Bolero Neo Facelift
Mahindra Vision S: महिंद्राची ‘ही’ एसयूव्ही करणार क्रेटा आणि सिएराची हवा टाईट! दमदार फीचर्ससह येतेय

इंजिन आणि कामगिरी

इंजिनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, नवीन बोलेरो निओमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. ही एसयूव्ही सध्या वापरत असलेले 1.5 लीटर, 3-सिलेंडर mHawk 100 टर्बो डिझेल इंजिन कायम ठेवेल. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले असेल. हे इंजिन 100 bhp ची कमाल पॉवर आणि 260 Nm चा टॉर्क निर्माण करते.

ऑटोमॅटिक मॉडेलच्या वाढत्या मागणीचा विचार करता, महिंद्रा नवीन बोलेरो निओसोबत एएमटी (AMT) गिअरबॉक्सचा पर्याय देऊ शकते. यामुळे, ज्या ग्राहकांना ऑटोमॅटिक गाड्या हव्या आहेत, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरेल. गाडीचे आरडब्ल्यूडी (रियर-व्हील ड्राइव्ह) सिस्टीम आणि 4x2 कॉन्फिगरेशन पूर्वीच्या मॉडेलप्रमाणेच कायम राहतील.

Mahindra Bolero Neo Facelift
Mahindra SUV: स्कॉर्पिओ, थारचा जलवा...! मंहिंद्रानं उडवली टाटाची झोप; भारतीय ग्राहकांची पहिली पसंती

किंमत आणि भविष्यातील योजना

सध्याच्या महिंद्रा बोलेरो निओची सुरुवातीची किंमत 9.97 लाख रुपये असून, ती 12.18 लाख रुपयांपर्यंत जाते. नवीन फीचर्समुळे 2025 च्या मॉडेलची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. महिंद्रा अँड महिंद्राने पुष्टी केली की, नवीन जनरेशनची बोलेरो आणि बोलेरो ईव्ही (EV) 2026 मध्ये बाजारात येतील. नवीन बोलेरो महिंद्राच्या नवीन NU_IQ प्लॅटफॉर्मवर आधारित पहिला मॉडेल असण्याची शक्यता आहे, जो 15 ऑगस्ट 2025 रोजी सुरु करण्यात आला होता. पुढील पिढीच्या या एसयूव्हीमध्ये डिझाइन, इंटिरियर आणि फीचर्सच्या बाबतीत मोठा बदल अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com