Manish Jadhav
महिंद्रा थार फेसलिफ्ट सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होणार आहे. आधी ही धमाकेदार थार 2026 मध्ये लाँच केली जाईल, अशी चर्चा होती.
गाडीच्या एक्सटीरियरमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नवीन ग्रिल, टेल लॅम्प आणि अपडेटेड बंपरसह अधिक आकर्षक लूक मिळेल.
आधुनिक इंटीरियरमध्ये मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इलेक्ट्रिक स्टीअरिंग व्हील मिळेल.
या नवीन मॉडेलमध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि वायरलेस फोन चार्जरसारखे प्रीमियम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
सुरक्षिततेसाठी 360-डिग्री कॅमेरा, रिअर डिस्क ब्रेक आणि लेव्हल-2 ADAS सूट यांसारख्या आधुनिक सुरक्षा सुविधांचा समावेश केला जाईल.
नवीन थारमध्ये 2.0 लिटर टर्बो पेट्रोल, 1.5 लिटर आणि 2.2 लिटर टर्बो डिझेल असे तीन इंजिन पर्याय पूर्वीप्रमाणेच कायम राहतील.
पेट्रोल इंजिन 152 bhp ची पॉवर, तर 1.5 लिटर आणि 2.2 लिटर डिझेल इंजिन अनुक्रमे 119 आणि 130 bhp ची पॉवर जनरेट करतील.
6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध असतील. तसेच RWD आणि 4WD दोन्ही सिस्टिम असतील.