Zuvem Bridge Demand Dainik Gomantak
Video

Zuvem: गोव्यातील 38 वर्षे जुना पूल धोकादायक स्थितीत! ग्रामस्थांनी केली पाहणीची मागणी; Video

Zuvem Bridge Demand: आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांचा विचार केला तर या पुलाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे तातडीने या पुलाची पाहणी करावी, अशी मागणी परब यांनी मोन्सेरात यांच्याकडे केली.

Sameer Panditrao

पणजी: जुवे-नादोडा येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मनोज परब यांच्या नेतृत्वाखाली महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची भेट घेतली. आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांचा विचार केला तर या पुलाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे तातडीने या पुलाची पाहणी करावी, अशी मागणी परब यांनी मोन्सेरात यांच्याकडे केली. फेब्रुवारी २०२५ पासून वाहन वाहतुकीसाठी बंद असलेल्या या पुलामुळे गेल्या १०-१५ वर्षांपासून त्याच्या पुनर्बांधणीची मागणी स्थानिक करीत आहेत. वारंवार स्थानिक आमदारांकडे हा विषय मांडला, परंतु त्यांच्या तक्रारींचे निराकरण होत नाही. मंत्री मोन्सेरात यांनी तातडीने यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

याबाबत म्हणाले, ३८ वर्षे जुना हा पूल अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती दुरुस्ती केली असली तरी तो अजूनही बंद आहे, त्यामुळे स्थानिकांची गैरसोय होत आहे. जुवे बेट हा पूरप्रवण क्षेत्र आहे आणि पावसाळा जवळ येत असल्याने पुरामुळे येथे पाणी साचण्याचा धोका जास्त आहे. जुवेच्या लोकांसाठी नवीन पूल अत्यंत गरजेचा आहे. पावसाळ्यात या पुलाविषयी निर्णय घेण्यास विलंब झाल्यास संकट निर्माण होऊ शकते, ज्यामुळे रहिवाशांचा वाहतुकीचा मार्ग बंद होऊ शकतो. या पुलाचा विषय निकाली निघेपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू, असेही परब यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: गोव्यात काचेच्या बाटलीतून बिअर विक्री होणार बंद? सार्वजनिक ठिकाणी दारुची बाटली फोडल्यास 50,000 दंडाची तरतूद

PM Kisan 20th installment: PM किसान योजनेच्या 20वा हप्त्याची तारीख जाहीर! 'या' दिवशी खात्यात जमा होणार पैसे

Goa Assembly Live: धिरयो कायदेशीर करा; आमदारांची मागणी

Operation Sindoor: भारताने पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले, पण अचानक संघर्षविराम का केला? 'पाकव्याप्त काश्मीर' ताब्यात का घेतला नाही?

Goa Third District: 'तिसऱ्या जिल्ह्या'त फोंड्याचा समावेश का नाही?

SCROLL FOR NEXT