
आरोग्य विभागात गेल्या पाच वर्षांत झालेल्या भरती प्रक्रियेवरुन मोठा वाद निर्माण झाला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गंभीर आरोप केला. आलेमाव म्हणाले की, आरोग्य विभागात गेल्या पाच वर्षांत झालेल्या 2148 कर्मचाऱ्यांच्या भरतीपैकी तब्बल 40 टक्के कर्मचारी एकट्या सत्तरी तालुक्यातील आहेत.
मांद्रेचे आमदार जित आरोलकर यांनी सरकारला प्रत्येक गावात स्मशानभूमी आणि धार्मिक क्षेत्रे स्थापन करण्याचे आवाहन केले आहे, तसेच अंतिम संस्कार आणि धार्मिक विधी करण्यासाठी योग्य सुविधांची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री रोहन खवंटे यांनी मुद्रण आणि स्टेशनरी विभागांतर्गत ५ डिजिटल उपक्रम सुरू केले.
१. ऑनलाइन ई-राजपत्राचे प्रकाशन.
२. इन्व्हेंटरी व्यवस्थापन प्रणाली.
३. प्रमाणित राजपत्राच्या ई-प्रती.
४. मुक्तीपूर्व ई-पुस्तके.
५. मुद्रण आणि स्टेशनरीसाठी सुधारित वेबसाइट.
राज्यातील एका शाळेत झालेल्या बनावट भरती घोटाळ्याचा पर्दाफाश विजय सरदेसाई यांनी केला. शून्य प्रहरात विजय सरदेसाई यांनी संपूर्ण फाइल दाखवली, शिक्षण सचिव प्रसाद लोलियेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीची मागणी.
खाण ब्लॉक लिलाव जिंकलेल्या बांदेकर कंपनीला शिरगावातील, तर 'जेएसडब्ल्यू स्टील'ला कुडणेतील ब्लॉक सुरू करण्यास खाण खात्याची परवानगी. दोन्ही ब्लॉक लवकरच होणार सुरू.
तामिळनाडूतील 'जलिकट्टू'च्या धर्तीवर राज्यातील धिरयो' कायदेशीर करण्यासाठी कायदा करा. त्यासाठी जागा निश्चित करा. 'धिरयो'मुळे राज्यात येणार्या पर्यटकांत वाढ होईल : आमदार जीत आरोलकरांनी मांडली लक्षवेधी सूचना
आमदार व्हेंझी व्हिएगश, विरेश बोरकर यांचा पाठिंबा.सरकारचा महसूल वाढण्याचा दावा
भटक्या गुरांसाठी राज्यात ६ ठिकाणी निवारा केंद्रे. पंचायतींनी या केंद्रांशी सामंजस्य करार करून भटक्या गुरांना या केंद्रांत पाठवावे. यासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
भटक्या गुरांमुळे अपघात वाढत असल्याचा आमदार क्रुज सिल्वा यांचा दावा
नाव, आडनावातील अक्षरांच्या तफावतींमुळे अनेकांना 'लाडली लक्ष्मी' योजनेचा लाभ मिळत नाही. यासाठी अनेकदा महिला आणि बाल कल्याण खात्याचे अधिकारीही जबाबदार असतात : गोविंद गावडे, आमदार
मंत्री म्हणून या खात्याची संपूर्ण जबाबदारी माझी, अधिकार्यांना दोष नको : विश्वजीत राणे, मंत्री
किनारी भागांतील मद्यालयांकडून पर्यटकांना बियर काचेच्या बाटल्यांऐवजी 'कॅन'मधून कशापद्धतीने उपलब्ध करता येईल याबाबत विचार करू : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमं
समुद्र किनार्यांवर प्लास्टिक कचरा साठू नये यासाठी डिपॉझिट रिफंड योजना (डीआरएस) लवकरात लवकर कार्यान्वित करणे गरजेचे. आगामी पर्यटन हंगामाअाधी किनार्यांवर जाणार्या रस्त्यांवर सुरक्षा रक्षकांसह प्लास्टिक कचरा बंदीचे फलक लावणार : रोहन खंवटे, मंत्री, पर्यट
४० वर्षांच्या मागणीनंतर, कर्नाटक सरकारने अखेर वेर्णाजवळ एक समर्पित कन्नड भवन बांधण्यासाठी जमीन खरेदी केली आहे - ६ लाखांहून अधिक कन्नड भाषिक गोव्यातील लोकांसाठी एक सांस्कृतिक केंद्र तयार केले जाणार आहे.
हडफडे, मोरजी आणि केरी सारख्या समुद्रकिनाऱ्यांवर कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ होत आहे. ९०० हून अधिक प्रकरणांसह, गोव्यातील पर्यटन स्थळे अजूनही सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय.
साळगाव रस्त्यावर दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या भीषण अपघातात थिवी येथील ओंकार कारापूरकर (२५) आणि आसाम येथील मोहम्मद फ्राझ (३०) यांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे तातडीने वैद्यकीय मदत आणि टक्कर का कारण आहे याचा पोलिस तपास सुरू करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.