Dudhsagar River Drowning Death News Dainik Gomantak
Video

Dudhsagar: वाढदिवसादिनीच काळाचा घाला, तरुण दूधसागर नदीत बुडाला! तीन दिवसांत 2 घटना

Dudhsagar River Drowning Death: अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण कॅमेऱ्यात तो काही दिसला नाही.

Sameer Panditrao

फोंडा: ओकांब-धारबांदोडा येथे शनिवारी दुपारी मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला प्रथम सूरज सावंत (२१, माशे-काणकोण) हा युवक दूधसागर नदीत आंघोळ करीत असताना अचानक पाण्यात बुडाला. वाढदिवसाच्याच दिवशी ही घटना घडली असून याची माहिती मिळताच फोंडा पोलिस व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ओकांब येथील नदीच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या युवकांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी दुपारी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रथम सावंत हा आपल्या मैत्रिणीबरोबर तिस्क-उसगाव येथे त्याचा मित्र प्रदीप वाघ याच्या घरी आला होता. नंतर दुपारी ओकांब येथील दूधसागर नदीत प्रथम सावंत, मैत्रीण व मित्रासोबत आंघोळीसाठी गेला होता. आंघोळ करीत असतानाच प्रथम पाण्यात गटांगळ्या खाताना त्याचा मित्र प्रदीप वाघला दिसला. प्रदीपने त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण त्याला यश आले नाही. नंतर प्रदीप वाघ याने पाण्याच्या बाहेर येऊन आपल्या अन्य मित्रांना ओकांब येथे नदीच्या काठी बोलवून घेतले व फोंडा पोलिस व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचरण करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण कॅमेऱ्यात तो काही दिसला नाही. रात्र झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. फोंडा पोलिस स्थानकाचे ताबा असलेले म्हार्दोळ पोलिस स्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाण्यात बेपत्ता झालेल्या युवकाचा रविवारी (ता.२७) सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.

ओकांब येथील दूधसागर नदीवर ही दुसरी घटना घडल्याने स्थानिक लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या १६ फेब्रुवारी रोजी ओकांब येथे याच ठिकाणी दिल्ली येथील युवकाचा बुडून मृत्यू झाला होता.

तीन दिवसांत दोन घटना

दूधसागर नदीत अवघ्या तीन दिवसांत दोन युवक बुडण्याची घटना घडली. ताकार-दावकोण येथील दूधसागर नदीवर गुरुवारी (ता.२४) सायंकाळी आंघोळीसाठी गेलेला वास्को येथील युवक बुडाला होता. शुक्रवारी सकाळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेऊन हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला होता. शनिवारी पुन्हा एकदा बुडण्याची घटना घडली असल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT