Westrn Bypass Garbage Issue Dainik Gomantak
Video

Western Bypass: पश्चिम बगल रस्ता ठरतोय त्रासदायक! कचरा फेकण्याचे प्रकार; नावेली, तळावलीवासीय हैराण

Western Bypass Garbage Issue: पश्र्चिम बगल रस्त्यामुळे अनेकांना फायदा होत असला तरी नावेली व तळावली येथील रहिवाशांसाठी हा रस्ता त्रासदायक ठरत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Western Bypass Problems

सासष्टी: पश्र्चिम बगल रस्त्यामुळे अनेकांना फायदा होत असला तरी नावेली व तळावली येथील रहिवाशांसाठी हा रस्ता त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याखालून जात असलेला अंडरपासामुळे अपघाताची स्थिती उद्‍भवत आहे. तसेच बगल रस्त्यावरून कचरा फेकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे काही काळाने या रस्त्यावर कचऱ्याच्या राशी दिसू लागतील, अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.

या अंडरपास रस्त्यालगत चारही बाजूंनी गतिरोधक घालणे आवश्यक आहे. तसेच जिथे कचरा टाकला जातो तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात येत आहे.

आंतोनियो फर्नांडिस यांनी सांगितले की, या भागात वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे. इथे सिग्नल व दिशा दर्शविणारे, माहिती देणारे फलकांची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही या पश्र्चिम बगल रस्त्यावरील उड्डाणपुलाचा पाहणी केली होती व गतिरोधकाची आवश्यकता व्यक्त केली होती असे त्यांनी सांगितले.

रॉक फर्नांडिस यांनी सांगितले की, केवळ विकास करून भागणार नाही, तर ते करताना गतिरोधक, फलक, सीसीटीव्ही कॅमेरे सारख्या बारीक सारीक गोष्टीचा विचार केला पाहिजे. गेल्या चार पाच दिवसांत या भागात पाच ते सहा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. फ्रॅंकी डिसोझा यांनी सांगितले की, येथे कचरा कोण आणून टाकतो, यावर आपण गेले तीन रात्री जागरण करून पाळत ठेवली पण कोणी सापडले नाही. बहुधा पहाटे हा कचरा फेकला जात असावा. पंचायत, सरकारने त्वरित याची दखल घेऊन उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beach Shacks: तब्बल 450 शॅक होते, नोंदणीविनाच! शॅकवरही पर्यटन खात्याचा अंकुश; नोंदणी आता अनिवार्य

अशक्य ते शक्य करून दाखवलं! 25 वर्षांच्या पोरानं उचललं 511 किलो वजन; नवा वर्ल्ड रेकॉर्ड पाहून क्रीडाविश्व थक्क, Watch Video

Ketu Gochar 2026: नशिबाची साथ अन् आर्थिक भरभराट! मघा नक्षत्रातील केतु बनवणार 5 राशींना धनवान; पैशांचा होणार पाऊस

Goa Medical Act: गोवा वैद्यकीय हिंसाचार कायद्याचे कलम 7 घटनात्मक आहे का? उच्च न्यायालयात आव्हान; राज्य सरकारला उत्तरासाठी 3 आठवड्यांची मुदत

GIM Student Attack: हॉस्टेलच्या खोलीत झोपलेल्या विद्यार्थिनीवर चाकूने वार! 'जीआयएम'मध्ये खळबळ; सहकारी विद्यार्थिनी अटकेत, 5 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT