Amit Patkar teachers salary issue Dainik Gomantak
Video

VIDEO: शिक्षिकांच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष? वेतनाच्या मुद्द्यावर अमित पाटकर आक्रमक; म्हणाले, 'दखल घेतली जात नाही हे दुर्दैवी'

Amit Patkar teachers salary issue: राज्‍यातील पूर्व प्राथमिक शिक्षकांच्‍या वेतनाच्‍या प्रश्‍‍नावरून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर सोमवारी पुन्‍हा आक्रमक झाले.

Sameer Amunekar

पणजी: राज्‍यातील पूर्व प्राथमिक शिक्षकांच्‍या वेतनाच्‍या प्रश्‍‍नावरून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर सोमवारी पुन्‍हा आक्रमक झाले. शिक्षिकांसह त्‍यांनी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांची भेट घेत, आठ दिवसांत शिक्षिकांच्‍या वेतनवाढीसंदर्भातील फाईलला सरकारची मंजुरी मिळवून घेण्‍याची मागणी त्‍यांनी केली.

संचालक झिंगडे यांच्‍या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटकर म्‍हणाले, ‘‘पूर्व प्राथमिकच्‍या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सुमारे तीन हजार शिक्षिका २०१२ पासून आपल्‍या न्‍याय-हक्‍कांसाठी झगडत आहेत. राज्‍य सरकारने अनुदानित शाळांतील प्राथमिक शिक्षकांना अनुदान दिले; परंतु पूर्व प्राथमिक शिक्षिकांना बाहेर ठेवून त्‍यांच्‍यावर अन्‍याय केला.

२०२२ पासून राज्‍यात लागू झालेल्‍या नव्‍या शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन पातळी अतिशय महत्त्‍वाची असते. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही ही बाब मान्‍य केलेली आहे. तरीही या पातळीवर मोडणाऱ्या बालवाटिका एक, दोन आणि तीनमधील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षिकांची सरकार दखल घेत नाही, हे दुर्दैवी आहे.’’

गत अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शिक्षिकांच्या नोंदणीची हमी दिली होती. मात्र, अर्ज अद्याप सरकारला सादर झालेला नाही. संचालकांनी आठ दिवसांची मुदत मागितल्याचे पाटकर यांनी सांगितले. यावेळी जॉन नाझारेथ, मनिषा उसगावकर आदीही उपस्‍थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: बॉस पण खूश अन् पाकीट पण फुल! 12 नोव्हेंबरनंतर 'या' 4 राशींचे पालटणार नशीब; मंगळ गोचरमुळे आयुष्याला मिळणार नवा टर्न

Southern Railways Rules: रेल्वेत मोठ्या आवाजात गाणी, रील्स लावल्यास होणार कारवाई; दक्षिण रेल्वेचा प्रवाशांना कडक इशारा! नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

Goa Political Reservation: 2027च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण प्रक्रिया पूर्ण करा; अनुसूचित जमातींचा सावंत सरकारला अल्टीमेटम!

Goa Beach: समुद्रकिनाऱ्यांवर औषधांना दाद न देणारे जीवाणू, NIO चा निष्कर्ष; पावसाळ्यात 50 टक्के पाण्याची गुणवत्ता खराब

"हे नक्की काय चाललंय?", भोममधील बागायती जमिनीच्या रुपांतरणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सरपंचांना निवेदन देत आंदोलनाचा दिला इशारा!

SCROLL FOR NEXT