Verca Beach Sand Extraction Dainik Gomantak
Video

Verca Sand Extraction: वार्का किनारपट्टी भागात बेकायदेशीर वाळू उपसा; स्थानिकांचा आरोप

Verca Beach Sand Extraction: वार्का समुद्रकिनाऱ्यावर काही अज्ञात व्‍यक्‍तींकडून मोठ्या प्रमाणावर सँड ड्यून्‍सचा विध्‍वंस करण्‍यात आला असून या प्रकरणात स्‍थानिकांनी प्राधिकरण आणि कोलवा पोलिसांत तक्रार दिली आहे.

Sameer Panditrao

मडगाव: वार्का समुद्रकिनाऱ्यावर काही अज्ञात व्‍यक्‍तींकडून मोठ्या प्रमाणावर सँड ड्यून्‍सचा विध्‍वंस करण्‍यात आला असून या प्रकरणात स्‍थानिकांनी किनारपट्टी व्‍यवस्‍थान प्राधिकरण आणि कोलवा पोलिसांत तक्रार दिली आहे. हा वाळूचा पट्टा कापल्‍याने समुद्राचे पाणी जवळच्‍या शेतात शिरून शेताचा विध्‍वंस होऊ शकतो, अशी भीती स्‍थानिकांनी व्‍यक्‍त केली आहे.

स्‍थानिकांनी पेड-वार्का येथे झालेल्‍या या विध्‍वंसावर प्रसारमाध्‍यमांद्वारे उजेड पाडला. यावेळी बाप्तिस्‍त फर्नांडिस यांनी पोकलीनचा वापर करून हा वाळूचा पट्टा खणला आहे, हे कुणाचे कारस्‍थान ते आम्‍हाला माहिती नाही. मात्र, ऐन पावसाळ्‍यात ज्‍यावेळी समुद्रातील पाणी वाढते त्‍यावेळी असा प्रकार केल्‍याने समुद्राचे पाणी आता शेतात शिरून मोठ्या प्रमाणावर नासाडी होऊ शकते, याकडे त्‍यांनी लक्ष वेधले.

हा प्रकार आम्‍ही स्‍थानिक आमदार वेन्झी व्‍हिएगस यांच्‍या कानावर घातला आहे. त्‍यांनी यासंबंधी चौकशी करावी, अशी मागणी फर्नांडिस यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT