Bicholim Mineral Transport Dainik Gomantak
Video

Vedanta Mining: डिचोलीत 'ट्रकांची' धडधड सुरु, खनिज वाहतुकीस ट्रकमालक राजी; 'वेदांता'कडून मागण्या मान्य

Goa Mining: डिचोलीतील ‘वेदांता’ खाणीवरील एक दिवस लांबणीवर पडलेली खनिज वाहतूक आता सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

Sameer Panditrao

Mining transport in Goa resumes

डिचोली: डिचोलीतील ‘वेदांता’ खाणीवरील एक दिवस लांबणीवर पडलेली खनिज वाहतूक आता सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. ट्रकमालकांची मागणी ‘वेदांता’ने मान्य केल्याने नियमित खनिज वाहतूक करण्यास स्थानिक ट्रकमालक राजी झाले आहेत.

आज (सोमवारी) ट्रकमालकांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उद्या मंगळवारपासून या खाणीवर नियमित खनिज वाहतूक सुरू होणार आहे.‘वेदांता’ कंपनीने खाणीवर बाराचाकी हायटॅक कंत्राटी ट्रक खनिज वाहतुकीच्या कामाला लावले होते. त्यामुळे ट्रकमालक अस्वस्थ झाले होते. हायटॅक ट्रक बंद करावेत, स्थानिक ट्रकांनाच काम द्यावे, अशी मागणी करीत स्थानिक ट्रकमालकांनी गेल्या सोमवारपासून खनिज वाहतूक बंद केली होती.

‘रिजेक्शन’ वाहतुकीसंदर्भात आज निर्णय

हायटेक कंत्राटी ट्रक बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतल्यामुळे अंतर्गत खाणीवरील ‘रिजेक्शन’ मालाची वाहतूक आता स्थानिक ट्रकांनाच करावी लागणार आहे. मात्र, मंगळवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत ट्रकमालक संघटनेचे पदाधिकारी खाणीवरील सुविधांची पाहणी करणार आहेत. त्यानंतरच ‘रिजेक्शन’ वाहतुकीसंदर्भात निर्णय होणार आहे, अशी माहिती डिचोली ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष राजाराम परब गावकर यांनी दिली.

हायटेक ट्रक ‘स्क्रॅप यार्डा’त

शनिवारच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सोमवारपासून खनिज वाहतूक सुरू होणार अशी अपेक्षा होती. मात्र, हायटॅक ट्रकांचा विषय पुन्हा उपस्थित झाल्याने खनिज वाहतुकीसाठी ट्रक रस्त्यावर उतरलेच नाहीत. अगोदर खाणीवरील हायटेक ट्रक बाहेर काढा अशी भूमिका स्थानिक ट्रकवाल्यांनी घेतली. अखेर सुरक्षेची उपाययोजना म्हणून हे ट्रक कंपनीच्या ‘स्क्रॅप यार्ड’मध्ये ठेवण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident: खाटूश्यामजींच्या दर्शनाला निघालेल्या प्रवाशांवर काळाचा घाला, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 8 मृत्यू, 10 जखमी

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

Merces Court Incident: मेरशी न्यायालयात खळबळ! पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने पोक्सो आरोपी गंभीर जखमी

IND vs WI 5th T20I, Weather Report: रोमांचक मालिका निर्णायक टप्प्यावर, पण पावसानं वाढवली धाकधूक; बंगळुरुचं हवामान ठरवणार भारत-वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल

Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

SCROLL FOR NEXT