वाळपई: गोवा पर्यटन खात्याच्या सौजन्याने सत्तरी तालुका शिमगोत्सव समितीतर्फे आयोजित लोकोत्सवाचे गुरुवारी सायंकाळी वाळपई फोंडा जंक्शन येथे थाटात उद्घाटन करण्यात आले. पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेला सुरवात झाली.
यावेळी वाळपईच्या नगराध्यक्ष प्रसन्ना गावस, उपनगराध्यक्ष रामदास शिरोडकर, नगरसेवक शेहझीन शेख, विनोद हळदणकर, माजी आमदार नरहरी हळदणकर, नगरगाव जि.पं.सदस्य राजश्री काळे, होंडा जि पं. सदस्य सगुण वाडकर, केरी जि.पं.स. देवयानी गावस, समितीचे उपाध्यक्ष विनोद शिंदे, खजिनदार प्रसाद खाडिलकर, उसगावचे जि. पं. सदस्य उमाकांत गावडे तसेच विविध पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंच, वाळपईचे नगरसेवक आदी आदी उपस्थित होते.
सुरवातीला राणे यांच्या हस्ते देवतेचे पूजन झाले. सूर्यकांत गावस यांनी देवाला सार्वजनिक सांगणे केले. त्यानंतर शोभायात्रेला सुरवात करण्यात आली. यानिमित्त राज्यस्तरीय चित्ररथ स्पर्धा, रोमटामेळ स्पर्धा, वेशभूषा, लोकनृत्य आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.