Illegal Hill Cutting Dainik Gomantak
Video

Valpoi Illegal Hill Cutting: वाळपईतील 'हे' सुंदर गांव विध्वंसाच्या मार्गावर!

Valpoi Illegal Hill Cutting: वाळपई शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं धारकण हे गावही विध्वंसाच्या वाटेवर पोहोचले आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून डोंगरी कापणीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. काही दिवसांपूर्वीच, फोंडा तालुक्यातील प्रियोळ भागात बेकायदा डोंगर कापणी केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध म्हार्दोळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. तर मोरजीतही डोंगर कापणीच्या विरोधात ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेत. काल (19 ऑगस्ट) राज्याचे नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन डोंगर कापणीच्या मुद्यावर सख्त भूमिका घेतली. राणेंनी डोंगर कापणी करणाऱ्या लोकांना चांगलाचं सज्जड दम दिला. यातच आता, वाळपई शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं धारकण हे गावही विध्वंसाच्या वाटेवर पोहोचले आहे. धारकणमध्येही मोठ्याप्रमाणात डोंगर कापणी केली जात असल्याने याला आळा बसवण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT