Goa Tourist Decline Dainik Gomantak
Video

Goa Tourism: '31 डिसेंबरलाही किनारे ओसच'; हे स्थित्यंतर दक्षिण गोव्यातील व्यावसायिकांना काळजीत टाकणारे

Goa Tourist Decline: दक्षिणेतील पर्यटन व्‍यावसायिकांचा भ्रमनिरास झाला. ३१ डिसेंबरला बरेच किनारे पर्यटकांअभावी ओकेबोके होते. हे स्‍थित्‍यंतर काळजीत टाकणारे आहे.

Sameer Panditrao

South Goa Tourist Decline

मडगाव: डिसेंबर महिना व नववर्षारंभ पर्यटन हंगामाविषयी बरंच काही सांगून जातो. यंदा उशिरा का होईना उत्तर गोव्‍यातील बहुतांश समुद्रकिनारे नाताळपासूनच गजबजले. ओस पडलेल्‍या हॉटेल्‍सना दिलासा मिळाला. परंतु दक्षिणेतील पर्यटन व्‍यावसायिकांचा भ्रमनिरास झाला. ३१ डिसेंबरला बरेच किनारे पर्यटकांअभावी ओकेबोके होते. हे स्‍थित्‍यंतर काळजीत टाकणारे आहे.

थर्टिफर्स्ट म्हणजे गोव्यातील समुद्र किनारे देशी आणि विदेशी पर्यटकांनी ओसंडून वाहतात असा जरी सर्वसाधारण समज असला तरी यावेळी दक्षिण गोव्यात वेगळेच चित्र दिसून आले. उत्तर गोव्यात पर्यटकांची झुंबड उडालेली असताना दक्षिण गोव्यातील समुद्र त्यामानाने सूनेच दिसत होते.

मंगळवारी सायंकाळी मडगाव जवळील कोलवा समुद्र किनाऱ्याला भेट दिली असता एरव्ही रविवारी या समुद्र किनाऱ्यावर गर्दी दिसून येते तेव्हढीही गर्दी दिसत नव्हती. गोव्यात येणारे पर्यटक बहुतेक उत्तर गोव्यातील बागा-कळांगुट तसेच वागतोर या किनाऱ्यांना पसंती देतात. सध्या गोव्यात देशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत पण बहुतेक पर्यटकांनी उत्तर गोव्यातील या समुद्र किनाऱ्यांना पसंती दिल्याने दक्षिण गोवा सुना सुना वाटत आहे, अशी माहिती पर्यटन व्यवसायात असलेले जॉन फर्नांडिस यांनी दिली.

पाळोळे हा दक्षिण गोव्यातील नयनरम्य असा समुद्र किनारा असून दरवर्षी थर्टिफर्स्टला या किनाऱ्यावर पर्यटक एव्हढी गर्दी करायचे की तिथे रस्त्याने चालून जाणेही कठीण व्हायचे, मात्र यावेळी हा समुद्र किनाराही पूर्वीच्या मानाने ओसच वाटला.

युवा पर्यटक उत्तर गोव्याला पसंती देतात, पण जे कुटुंबवत्सल पर्यटक गोव्यात येतात ते दक्षिण गोव्यातील शांत अशा समुद्र किनाऱ्यांना भेट देतात, अशी माहिती जॉन फर्नांडिस यांनी दिली.

कोलवा समुद्र किनाऱ्यावर जलक्रीडा केंद्र चालविणारा पेले फर्नांडिस यांना विचारले असता, यावेळी दक्षिण गोव्यातही पर्यटक आले आहेत पण ते पूर्वीप्रमाणे फक्त किनाऱ्यांनाच भेट देतात असे नव्हे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर लोक कमी दिसतात असे सांगितले. या ख्रिसमस सिझनला आम्ही चांगला व्यवसाय केला अशी पुस्तीही त्यांनी आपल्या म्हणण्याला जोडली.

दक्षिण गोव्यात सगळीकडे चोख पोलिस बंदोबस्त

दक्षिण गोव्यात मंगळवारी सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता. नववर्षाच्या स्वागतानिमित्त दक्षिण गोव्यातील एकूण ९८ चर्चेसमध्ये मध्यरात्री खास प्रार्थना झाली. तेथे एकूण ३१८ पोलिस तैनात करण्यात आले होते, अशी माहिती दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक सुनीता सावंत यांनी दिली.

मंगळवारी रात्री प्रत्यक्ष गस्तीवर एकूण ५८५ पोलिस तैनात होते. यात १६ पोलिस निरिक्षक, ५३ उपनिरीक्षक, २२ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, ४४ हवालदार, २८६ पोलिस शिपाई, ३७ महिला पोलिस, ७९ होमगार्ड तर ४० आयआरबी पोलिसांचा समावेश होता. गस्त व नागरिकाच्या सुरक्षेसाठी रॉबर्ट पोलिस ४८, व पिंक फोर्स पोलिस उपलब्ध करण्यात आले होते. तर रस्त्यावर १२० पोलिस होते. नाकाबंदीसाठी एकूण ७८ पोलिस ठेवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT