Hankhane Protest Tillari Canal Dainik Gomantak
Video

Tillari Canal: तिलारीजवळ जड वाहनांवर बंदी घालण्याची हनखणे येथील स्थानिकांची मागणी

Hankhane Protest: हणखणे येथील अवजड वाहतुकीमुळे कालव्याला धोका निर्माण झाला असून या विरोधात येथील शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे.

Sameer Panditrao

पेडणे: हणखणे येथील तिळारी कालव्याच्या जोड रस्त्यावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीविरोधात उपाययोजना करण्याचे आश्‍वासन धारगळ येथील जलस्रोत विभागाचे कार्यकारी अभियंता यतीन शिरोडकर यांनी दिले.

हणखणे येथील अवजड वाहतुकीमुळे कालव्याला धोका निर्माण झाला असून या विरोधात येथील शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे.

मंगळवारी या शेतकऱ्यांनी धारगळ येथील जलस्रोत विभागाच्या कार्यालयावर धडक दिली व आपले म्हणणे कार्यकारी अभियंत्यासमोर मांडले.

यावेळी ॲड जितेंद्र गावकर, पेडणे काँग्रेस गट अध्यक्ष कृष्णा नाईक, उदय महाले, रमाकांत तुळसकर, हणखणे येथील भराडी देवी पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष धर्मा नाईक व , उपाध्यक्ष गोपाळ नाईक आदी उपस्थित होते. अवजड वाहतुकीमुळे हा रस्ता कोसळल्यास पाणीपुरवठा बंद होऊन शेती बागायतींचे नुकसान होणार आहे, अशी चिंता यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

कार्यकारी अभियंता यतीन शिरोडकर यांनी सार्वजनिक बांधकाम खाते, रस्ता विभाग यांच्याशी चर्चा करून यावर आवश्यक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT