Basaveshwar Temple Theft, Zadani Sattari Temple Theft Dainik Gomantak
Video

Basaveshwar Temple Theft: सत्तरीतील बसवेश्वर मंदिरात पुन्हा चोरी! फंडपेटी लंपास, CCTVसह साहित्याची तोडफोड

Basaveshwar Temple Zadani Sattari Theft: झाडानी सत्तरी येथील प्रसिध्द बसवेश्वर मंदिरात पुन्हा चोरी झाली असून तेथील साहित्याची मोडतोड करून अज्ञातांनी फंडपेटीही लंपास केली आहे.

Sameer Panditrao

वाळपई: नगरगाव पंचायत क्षेत्रातील झाडानी सत्तरी येथील प्रसिध्द बसवेश्वर मंदिरात पुन्हा चोरी झाली असून तेथील साहित्याची मोडतोड करून अज्ञातांनी फंडपेटीही लंपास केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मंदिरातील कपाट फोडून साहित्य फेकले असून परिसरात आगही लावली.

यावेळी सविस्तर वृत्त असे की, झाडानी गाव हा म्हादई अभयारण्य क्षेत्रात येत असून १९९९ नंतर हा परिसर म्हादई अभयारण्यात घोषित केल्यानंतर येथे असलेले श्री देव बसवेश्वराच्या मंदिराचा विस्तार होऊन विकसित झाले. गेल्या काही वर्षापासून हे मंदिर प्रसिध्द होऊ लागल्याने येथे असलेल्या बसवेश्वराच्या मंदिरात शेकडो भाविकांतर्फे महाशिवरात्र साजरी होेते.

कसून तपास व्हावा

पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर म्हणाले, म्हादईच्या काठच्या या झाडानी गावात १९९८ मध्ये या भागाचा विस्तार झाला.तेव्हा आम्हाला २४ मूर्तींचा शोध लागला होता. त्यातील १६ पाषाणी मूर्ती आणून तिथे मंदिर उभारले. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रोत्सव साजरा केला जातो. सुमारे ४ ते ५ हजारांवर भाविक येथे जात असतात. पाषाणी पुरातन मूर्ती या आमच्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. येथील चोरीचा पोलिसांनी कसून तपास केला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: “लिटल फॅट, ब्लॅक शर्ट”! नाव, टेबल नंबर सोडून थेट बॉडी-शेमिंग; बंगळुरुमधील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या कारभारानं खळबळ

Mhadei Water Dispute: 'म्हादईला आई म्हणणे सोपे, वाचविणे कठीण'; न्यायालयीन लढ्यात सरकारची उदासीनता! राजेंद्र केरकर यांची टीका

Myanmar Military Airstrike: म्यानमारमध्ये लष्कराचा बौद्ध मठावर भीषण हवाई हल्ला! 14 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी

Saligao Constituency: साळगाव मतदारसंघामध्ये चुुरस, जयेश साळगावकर यांचा राजीनामा; केदार नाईकांपुढे पेच

Illegal Night Clubs: 'टिटोज लेन'वरील 17 नाईट क्लब्स रडारवर; आणखी 4 क्लबवर कारवाई, बेकायदा बांधकामांवर हातोडा

SCROLL FOR NEXT