Kharebandh road crash Dainik Gomantak
Video

मडगावच्या खारेबांधमध्ये भरधाव कारचा थरार; रविराज कॅफेजवळ उभ्या असलेल्या तीन वाहनांना उडवले

Margao car accident: मडगाव येथील खारेबांध परिसरात असलेल्या रविराज कॅफेजवळ एका भरधाव कारने भीषण अपघात घडवला.

Akshata Chhatre

मडगाव येथील खारेबांध परिसरात असलेल्या रविराज कॅफेजवळ एका भरधाव कारने भीषण अपघात घडवला. वेगावर नियंत्रण सुटल्याने या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन गाड्या आणि एका स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा सर्व प्रकार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कार चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, उभ्या असलेल्या वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचीही चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT