Homkund ritual Goa| Goa Lairai temple Dainik Gomantak
Video

Shirgaon Lairai Jatra: शिरगांवात 'होमकुंडाच्या' तयारीला सुरुवात 2 मे रोजी भरणार श्रीदेवी लईराईची जत्रा

Lairai Jatra 2025: देवीच्या उत्सवात मोठं होमकुंड पेटवलं जातं ज्यात देवीचे धोंड आगीतून चालतात, देवस्थानाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्यावर्षी २ मे रोजी ही जत्रा भरणार आहे

Akshata Chhatre

डिचोली: गोवा हा बऱ्यापैकी इथल्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. वर्षानुवर्षांपासून चालत आलेली ही संस्कृती आणि परंपरा गोव्याने आजही जपली आहे. यांपैकी एक म्हणजे डिचोली तालुक्यात शिरगांव येथे होणारी श्रीलईराई देवीची जत्रा. लईराई देवीची जत्रा आता केवळ देशातच नाही तर विदेशात देखील प्रसिद्ध होतेय. इथे देवीच्या उत्सवात मोठं होमकुंड पेटवलं जातं ज्यात देवीचे धोंड आगीतून चालतात. देवस्थानाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्यावर्षी २ मे रोजी ही जत्रा भरणार आहे.

गोव्यातील प्रसिद्ध श्रीदेवी लईराईची जत्रा व्यवस्थित पार पडावी म्हणून देवस्थान समितीकडून आत्तापासूनच कामाला सुरुवात करण्यात आलीये. यंदा २ मे रोजी देवीचा जत्रोत्सव होईल आणि त्यांनतर ३ तारीख ते ६ तारखेपर्यंत होमकुंडाचा उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती देवस्थान समितीने दिलीये. यासाठी आवश्यक असलेली साफसफाई, रंगरंगोटी, लाकडं जवळ करण्यासारखी सर्व कामे करण्याची सामितीकडून हाती घेण्यात आलीये अशी माहिती समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी दिली.

आत्ताच्या घडीला सर्वांजवळच वाहनांची सोय असल्याने भाविक मोठ्या संख्येत या उत्सवाला भेट देतायत, दिवसेंदिवस आकडा वाढतोय आणि सध्या भाविकांचा हा आकडा लाखोंच्या घरात पोहोचला असल्याची माहिती अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी दिली. देवीला नवस केलेला असल्यास भाविक होमकुंड पेटवण्यासाठी लाकडं आणून समर्पित करतात, मात्र होमकुंडासाठी काही विशिष्ठ लाकडांची गरज असते. इतर लाकडांच्या साहाय्याने होमकुंड पेटवलं जात नसल्याने भाविकांनी याबद्दल देवस्थान समितीशी संपर्क करावा अशी विनंती अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG ODI: सौरव गांगुलीच्या 'त्या' रेकॉर्डची बरोबरी करायला किंग कोहली सज्ज! मैदानात पाऊल ठेवताच रचणार इतिहास; इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका गाजवणार

Donald Trump: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा!' डोनाल्ड ट्रम्प यांना इराणी वृत्तपत्राचा इशारा; आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ

Labh Drishti Yog 2026: तिजोरी हाऊसफुल्ल होणार, व्यापाऱ्यांना बंपर फायदा! शनी-मंगळाचा 'लाभ दृष्टी योग' बदलणार 4 राशींचे नशीब; सर्व अडचणींचा द एंड

Road Accident: लग्नाचा आनंद ठरला शेवटचा! दोन ट्रकांच्या भीषण धडकेत चिरडली पिकअप; 13 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी VIDEO

8th Pay Commission Latest Update: पगारवाढच नाही, तर बोनस आणि ग्रॅच्युइटीमध्येही होणार मोठा फेरबदल! 8व्या वेतन आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT