Video

Sarzora Railway Station: सारझोरा प्रस्तावित रेल्वे स्टेशनला स्थानिकांचा विरोध

Sameer Panditrao

मडगाव: सारझोरा येथील प्रस्‍ताविक रेल्‍वे स्‍थानकाला विरोध करण्‍यासाठी वेळ्‍ळीचे आमदार क्रुझ सिल्‍वा यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍थानिकांनी रस्‍त्‍यावर उतरून निदर्शने केली.

या रेल्‍वे स्‍थानकामुळे या भागातील पर्यावरणावर विपरीत परिणाम आणि लोकांच्‍या शांततापूर्ण जीवनशैलीवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली. सरपंच लिओना फर्नांडिस आणि इतर पंचायत सदस्यांनी वेळ्‍ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांना निवेदन सादर करून प्रकल्पाला विरोध करण्याचे आवाहन केले. सारझोरा हे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे. या भागात वन्यजीवांचा अधिवास असून येथील लोक शेती व्‍यवसाय करतात. या भागात रेल्‍वेची वाहतूक वाढल्‍यास या सर्वावर विपरीत परिणाम होईल, असा दावा यावेळी स्‍थानिकांनी केला.

लोकांनी यावेळी रेल्‍वे अधिकाऱ्यांवर आरोप करताना विद्यमान रेल्वे क्रॉसिंगवर रोड ओव्हरब्रिजची गावच्या लोकांची दीर्घकाळापासूनची मागणी दुर्लक्षित केल्याचा दावा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT