ST community Oppose At Sancoale  Dainik Gomantak
Video

Sancoale News: पंचायत सचिवाची बदली करा! सांकवाळ येथील 'भूतानी' वादाला वेगळेच वळण

Bhutani Project Dispute: भूतानी मेगा प्रकल्पाविरोधात प्रेमानंद नाईक यांचे उपोषण चालू असताना रामा काणकोणकर व शंकर पोळजी तिथे आले होते. यावेळी त्यांची व सचिव वालेस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झडली. तेव्हा वालेस यांनी जातीवरून अपशब्द उच्चारले, असे काणकोणकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bhutani Infra Project Sancoale

सासष्टी: सांकवाळचे पंचायत सचिव ओर्विल वालेस यांनी जातीवरून अपशब्द उच्चारल्याने समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी वेर्णा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात मडगावात पत्रकारांशी बोलताना कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनी वालेस यांची बदली करावी. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भूतानी मेगा प्रकल्पाविरोधात प्रेमानंद नाईक यांचे उपोषण चालू असताना रामा काणकोणकर व शंकर पोळजी तिथे आले होते. यावेळी त्यांची व सचिव वालेस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झडली. तेव्हा वालेस यांनी जातीवरून अपशब्द उच्चारले, असे काणकोणकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

वेळीप यांचा आंदोलनाचा इशारा

उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनीदेखील दोन दिवसांत ओर्विल वालेसवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंचायत मंत्र्यांनीसुद्धा याची गंभीर दखल घ्यावी, असे वेळीप यांनी म्हटले आहे. कारवाई केली नाही तर जनआंदोलन केले जाईल, असेही वेळीप यांनी पुढे स्पष्ट केले.

अधिकारांचा गैरवापर ; सिल्वा

दरम्यान, वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी पंचायत संचालनालयाच्या संचालक सिद्धी हळर्णकर यांची भेट घेतली व सांकवाळचे सचिव पंच भूतानी मेगा प्रकल्पासंदर्भात व गावातील इतर कामांबद्दल अधिकारांचा गैरवापर करीत असल्याची माहिती त्यांना दिली. या सर्वांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणीही सिल्वा यांनी केली आहे.

प्रेमानंद नाईक यांना वाढता पाठिंबा

भूतानी इन्फ्रा' प्रकल्पाला दिलेले सर्व परवाने रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून मोठे समर्थन मिळू लागले आहे.

मुरगावचे माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर यांनी नाईक यांना 'भगवद्‌ गीता' भेट देत, या आंदोलनाला अवश्य यश प्राप्त होणार, असे सांगितले.

गुरुवारी सुनील कवठणकर, तुलियो डिसोझा, राजन घाटे, गौरेश नाईक आदींनी नाईक यांची भेट घेतली,.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

SCROLL FOR NEXT