Homkund Utsav Bicholim Dainik Gomantak
Video

Homkund Utsav Bordem: बोर्डे येथील प्रसिद्ध "होमकुंड" उत्सव उत्साहात साजरा Video

Homkund Utsav Bicholim: शेकडो भाविकांच्या साक्षीत आणि भक्तीमय वातावरणात बोर्डे येथील प्रसिद्ध "होमकुंड" उत्सव बुधवारी मध्यरात्री मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Sameer Panditrao

डिचोली: शेकडो भाविकांच्या साक्षीत आणि भक्तीमय वातावरणात बोर्डे येथील प्रसिद्ध "होमकुंड" उत्सव बुधवारी मध्यरात्री मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री वडेश्वर देवाच्या प्रांगणात हा उत्सव पार पडला.

बोर्डे येथील होमकुंड उत्सवाला मोठी परंपरा आहे. बुधवारी रात्री श्रींचा कलश मंदिराबाहेर काढण्यात आला. कलश मिरवणूक झाल्यानंतर रात्री ११ वा. होमकुंड पेटविण्यात आले. नंतर वाजतगाजत देवीच्या कलशासह व्रतस्थ भक्तगण गावतड येथील पवित्र झरीवर जाऊन स्नान करून पुनःश्च वाजतगाजत होमकुंडस्थळी आले.

माघारी येताना भक्तगणांतर्फे श्री सातेरी, श्री महामाया, श्री रवळनाथ, श्री ब्राह्मण, श्री वडेश्वर आदी देवतांचा भोवमान केला. होमकुंड स्थळी आल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता पारंपरिक कार्यक्रमांनुसार श्रींच्या कलशासहित व्रतस्थ भक्तगणांनी "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल" आदी देवदेवतांचा जयघोष करीत रखरखत्या होमकुंडातून अग्नीदिव्य केले. श्रींचा कळस माथ्यावर घेऊन अवसारी मोडानेही अग्नीदिव्य केले.नंतर कौलोत्सव होऊन या उत्सवाची सांगता झाली. होमकुंड उत्सवावेळी अग्नीदिव्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

Goa Kala Academy : कला अकादमीला आता तरी जाग येणार का?

SCROLL FOR NEXT