Ro Ro Ferryboat Dainik Gomantak
Video

Ro Ro Ferryboat Goa: ‘रो-रो’ फेरीमुळे महसुलात 30 % वाढ! अन्य जलमार्गांवरही मिळणार सेवा, Video

Chorao Raibandar Ro Ro Ferry Boat: लोटली येथील विजय मरिन सर्व्हिसेस कंपनीमध्ये दोन नव्या रो-रो फेरीबोटी बांधण्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

Sameer Panditrao

सासष्टी : रो-रो फेरीबोटींमुळे सरकारी महसुलात तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या ज्या दोन रो-रो फेरीबोटी चोडण- रायबंदर जलमार्गावर सुरू आहेत, त्या सरकारने विकत घेतलेल्या नसून ‘विजय मरीन’ कंपनीकडून भाड्याने घेतल्या आहेत, अशी माहिती नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

लोटली येथील विजय मरिन सर्व्हिसेस कंपनीमध्ये दोन नव्या रो-रो फेरीबोटी बांधण्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी मंत्री फळदेसाई म्हणाले, की पूर्वी जुन्या फेरीबोटीच्या माध्यमातून दिवसाकाठी केवळ ५ ते ६ हजार रुपये मिळायचे. आता केवळ दोन रो-रो फेरीबोटींमुळे दरदिवशी ३० हजार रुपये महसूल मिळत आहे. शिवाय तिकीट देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे महसुलात गळती होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

चोडण - रायबंदर या जलमार्गावरील रो - रो फेरीबोटीचा प्रकल्प यशस्वी ठरला तर राज्यातील अन्य जलमार्गांवरही रो - रो फेरीबोटी सुरू करण्यात येणार असल्याचे नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. आता दोन फेरीबोटींची बांधणी सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'तो' देवदूत बनून आला! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वासराला पाठीवर बसवून वाचवला जीव; पूरग्रस्त जम्मूतील हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

Mental Health And Heart Disease: नैराश्य आणि ताणतणाव वाढवतात हृदयविकाराचा धोका; मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं

मानसिक रुग्णांना मिळणार 'नवी उमेद'; IPHB मध्ये लवकरच सुरू होणार पुनर्वसन केंद्र

Gold Price Hike: शेअर बाजार पडला, पण सोन्याने घेतली उसळी, एका महिन्यात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ; आता सप्टेंबरमध्ये होणार नवा रेकॉर्ड?

Duleep Trophy 2025: 13 चौकार, 3 षटकार! आयुष बडोनीचा 'डबल धमाका'; द्विशतक ठोकून टीमला पोहोचवले उपांत्य फेरीत

SCROLL FOR NEXT