Valpoi Rice Harvesting Dainik Gomantak
Video

Rice Harvesting: अखेर वाळपई भागात भात कापणीला सुरुवात...

Valpoi: सत्तरी तालुक्यातील वेगवेगळ्या भागात सध्या खरीप भातपिकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून अंतिम टप्प्यातील कापणी आणि मळणीची कामे सुरू आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Rice Farming

वाळपई: गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे अखेर वाळपई भागात भातकापणीच्या कामाला जोरदार सुरुवात करण्यात आली.

यंदा लांबलेल्या पावसामुळे राज्यातील बहुतेक भागात भातकापणीला विलंब झाला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाळपई येथील हळदणकर यांची शेती पावसामुळे पाण्याखाली गेली होती. मात्र, लवकरात लवकर कापणी करणे गरजेचे होते. त्यामुळे आता ज्यांच्या शेतात एका बाजूला कापणी तर दुसऱ्या बाजूला भाताची मळणी सुरू आहे. शेतात पाणी भरल्यामुळे भातकापणी करताना कामगारांना काही प्रमाणात अडथळा येत आहे.

सत्तरी तालुक्यातील वेगवेगळ्या भागात सध्या खरीप भातपिकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून अंतिम टप्प्यातील कापणी आणि मळणीची कामे सुरू आहेत. त्यात यंदा संततधार पाऊस पडल्याने काही प्रमाणात भातांना कीड लागली होती. तसेच पिकाची पक्ष्यांकडूनही नासाडी झालेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT