Ramesh Tawadkar | Shramdham  Dainik Gomantak
Video

Shramdham Yojana: माणुसकीसाठी ‘श्रमधाम’ संकल्पना! पेडणेवासीयांनी ‘लोकोत्सवात' सहभागी व्हावे; तवडकरांचे आवाहन

Pernem News: पूर्वीच्या काळात माणुसकी व एकमेकांना सहकार्य करणे, होते त्याची जोपासना व्हावी याच भावनेने श्रमदानातून ‘श्रमधाम’ ही संकल्पना पुढे आली. ‘लोकोत्सव’ च्या माध्यमातून ती समाजासमोर मांडण्याची संधी मिळाली. पेडणेवासीयांनी या लोकोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: पूर्वीच्या काळात माणुसकी व एकमेकांना सहकार्य करणे, होते. निःस्वार्थी भावनेने नाती जोपासणाऱ्या संस्कृतीमुळे पूर्वीचा काळ सुखी होता. आज आपण हे हरवत चाललोत व त्याची जोपासना व्हावी याच भावनेने श्रमदानातून ‘श्रमधाम’ ही संकल्पना पुढे आली. ‘लोकोत्सव’ च्या माध्यमातून ती समाजासमोर मांडण्याची संधी मिळाली. पेडणेवासीयांनी या लोकोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

पेडणे येथे बिरसा मुंडा यांच्या जयंती व लोकोत्सवाचे आयोजनपूर्व विचार विनिमयासाठी पेडणे शेतकरी सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार प्रवीण आर्लेकर, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर ,सीमा खडपे, सतीश शेटगावकर ,मनोहर धारगळकर, सरपंच सुबोध महाले, तुळशीदास गावस, अशोक धावसकर ,छाया शेट्ये नगराध्यक्ष शिवराम तुकोजी, स्वाती गवंडी, शिवानी परब आदी मान्यवर उपस्थित होते.

तवडकर म्हणाले की, पेडणे व काणकोण ही राज्याची दोन्ही टोके एकत्र बांधली तर संपूर्ण गोवा मजबूत होईल. श्रमदान पूर्वीच्या काळी शासकीय योजना व मदतीचा हात नसतानाही आपण आपली शेती संस्कृती आनंदाने जोपासली. आपल्या घरात जर काही नसले तर आलेल्या पाहुण्याला नकळत शेजाऱ्यांकडून मदत घेऊन पाहुणचार करणे हे तेव्हापासून आतिथ्य जोपासले होते. काणकोण येथे भरणाऱ्या लोकोत्सवात सहभागी व्हावे व एक विशेष बोध घेऊन आपले जीवन सुखकर करावे. संपूर्ण गोव्यातील एक लाख लोक या लोकोत्सवात प्रत्यक्ष सहभागी होतील. सात दिवस संपूर्ण गोव्यात जागृती मोहीम काढली जाईल व तिची सुरवात पत्रादेवी येथून सुरवात होईल. सुमारे एक हजार मोटार सायकली प्रत्येक तालुक्यातील रॅलीत सहभागी असतील.

स्वागत तुळशीदास गावस यांनी केले. हर्षा परब, शांती किनळेकर, प्रणाली कशालकर, दीपाली भावे,दीपाली केरकर, यांनी मान्यवरांना पुष्प प्रदान केले. या सभेस किसन फडते, राजमोहन शेट्ये, कला व सांस्कृतिक खात्याचे उपसंचालक मिलींद माटे, सुर्यकांत तोरसकर, यांच्या बरोबरच पेडणे तालुक्यातील सरपंच उपसरपंच पंच शिक्षक साहित्यिक कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा पालयेकर यांनी केले. महादेव गवंडी यांनी आभार मानले.

आम्हाला गरिबी म्हणजे काय याची जाणीव आहे. राज्यकर्ते व नेतृत्व करणाऱ्यांनी आपली संस्कृती व परंपरा अभ्यासली पाहिजे.आमचे मुख्यमंत्री संस्कृती जोपासणारे आहेत. काणकोण बरोबरच पेडण्यात ‘श्रमधाम’ ची घरे व्हावीत, त्यासाठी मी प्रयत्न करणार.
प्रवीण आर्लेकर,आमदार पेडणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT