Kushavati District Dainik Gomantak
Video

Kushavati District: कुशावती जिल्‍ह्याचे मुख्‍यालय केपेच योग्य! Watch Video

Goa Third District: काणकोण, सांगे या भागातील महसुली व्‍यवहार केपेच्‍या या केंद्रातून व्‍हायचा त्‍यामुळे केपे, सांगे, काणकोण व धारबांदोडा या चारही तालुक्‍यांचा ‘कुशावती’ हा नवीन जिल्‍हा होत आहे.

Sameer Panditrao

मडगाव: पोर्तुगीज काळापासून केपे हे सासष्‍टीप्रमाणेच दक्षिण गोव्‍याच्‍या प्रशासनाचे एक महत्त्वाचे केंद्र होते. काणकोण, सांगे या भागातील महसुली व्‍यवहार केपेच्‍या या केंद्रातून व्‍हायचा त्‍यामुळे केपे, सांगे, काणकोण व धारबांदोडा या चारही तालुक्‍यांचा ‘कुशावती’ हा नवीन जिल्‍हा होत आहे, त्‍याचे मुख्‍यालय केपेतच असणे सोयीस्‍कर असेल, अशी प्रतिक्रिया आर्किटेक्‍ट राजीव सुखठणकर यांनी व्‍यक्‍त केली.

‘गोमन्‍तक’ टीव्‍हीच्‍या साष्‍टीकार या कार्यक्रमात बोलताना सुखठणकर यांनी हे मत मांडले. चारही तालुक्‍यासाठी केपे हे मध्‍यवर्ती केंद्र आहे. हा जिल्‍हा एसटी समाजाला नजरेसमोर धरून तयार केला गेला आहे. या समाजासाठी केपे हे जवळचे ठिकाण आहे. त्‍यामुळे केपेत मुख्‍यालय केले, तर या समाजासाठी त्‍याचा फायदाच होईल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

‘गोमन्‍तक’चे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

केपे तालुक्‍यात शासकीय महाविद्यालय आहे, उपजिल्‍हाधिकारी कार्यालय आहे आणि न्‍यायालयही आहे. काणकोण तालुक्‍याला उपजिल्‍ह्याचे ठिकाण जाहीर करण्‍यापूर्वी केपे उपजिल्‍ह्याखालीच काणकोणचे प्रशासन चालायचे. याची आठवण करुन देताना त्‍यावेळी केपेच्‍या या स्‍थानाला कुणीच हरकत घेतली नव्‍हती. मग आताच ही हरकत का? असा प्रश्‍न त्‍यांनी केला. फक्‍त दळणवळणाची समस्‍या असल्‍यास त्‍याची योग्‍य ती सोय सहज करता येणे शक्‍य आहे, असे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: 1.41 कोटींचा गंडा! नागपूरच्या 23 वर्षीय 'मास्टरमाईंड'ला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली वाळपईच्या एकाला लुटलं

Panchank Rajyog 2026: धनु राशीत मंगल-वरुणचा मिलाफ! 'पंचांक योग' उजळवणार 'या' 3 राशींचं नशीब; 7 जानेवारीपासून सुवर्णकाळ

"उद्या भारतासोबतही असं घडू शकतं..."; निकोलस मादुरोंच्या अपहरण प्रकरणावर काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य; सोशल मीडियावर पेटला वाद VIDEO

Kartik Aaryan: गोव्यातील सुट्ट्या अन् आता स्नॅपचॅट वाद! कार्तिक आर्यनच्या 'त्या' व्हायरल स्क्रीनशॉटने खळबळ; काय नेमकं प्रकरण?

मोपा विमानतळावरील वाहन प्रवेश शुल्कावरून 'GMR'ला शो-कॉज नोटीस; 7 दिवसांत मागितला खुलासा

SCROLL FOR NEXT