Protest At Lotulim Circle Against Illegal Activities And Land Conversions In Goa By Cruz Silva
सासष्टी: वेळ्ळीचे ‘आप’चे आमदार क्रुझ सिल्वा यांच्या नेतृत्वाखाली २ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या गोव्याचा निसर्ग व भविष्य सांभाळा या मोहिमेत अंतर्गत आज लोटली सर्कल जवळ आयोजित निषेध सभेत गोव्यासाठी नव्या क्षेत्रीय आराखड्याची मागणी करण्यात आली. जमिनीचे बेकायदेशीर रूपांतरण तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली. या सभेला आमदार वेन्झी व्हिएगश, आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर व इतर समाज सेवक उपस्थित होते.
आमदार व्हिएगश म्हणाले, नगरनियोजन मंत्री जमिनी विकण्यात गुंतले असून त्याविरोधात सर्व गोमंतकीयांनी एकत्र येऊन गोवा सांभाळण्याचे काम केले पाहिजे. चांगल्या व्यक्तींना निवडून दिले पाहिजे.
आमदार क्रुझ सिल्वा म्हणाले, गोव्याची शेती, डोंगर, नद्या, किनारे, जमीन ही गोव्याची संपत्ती आहे. आमच्या जमिनी, डोंगर विकायला सुरुवात झाली आहे. त्याचसाठी आम्हांला हवा तसा, गोव्याचे हित जपणारा क्षेत्रीय आराखडा आम्हांला हवा. २०२१ क्षेत्रीय आराखड्याची मुदत संपली, तरी त्यात दुरुस्त्या करून जमिनी विकल्या जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.