crime in goa  Dainik Gomantak
Video

पिर्णा हत्या प्रकरण 15 तासांत उलगडले; कांदोळीतील मुख्य आरोपीला अटक

pirna murder case: कोलवाळ पोलिसांनी खुनाची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या १५ तासांत या प्रकरणाचा छडा लावत मुख्य आरोपीला अटक केली

Akshata Chhatre

कोलवाळ पोलिसांनी खुनाची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या १५ तासांत या प्रकरणाचा छडा लावत मुख्य आरोपीला अटक केली असून, त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजता थिवी येथील पिर्णा गावाच्या डोंगराळ भागात एका २५-३० वर्षीय तरुणाचा मृतदेह गंभीर जखमांसह आढळला; तपासात हा तरुण उत्तर प्रदेशातील १९ वर्षीय कपिल चौधरी असल्याचे निष्पन्न झाले, जो बनावट ओळखपत्राचा वापर करून भाड्याची थार गाडी घेऊन गेला होता.

गाडीचा मालक आणि मुख्य आरोपी गुरुदत्त लवंदे (३१) याने जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने महाराष्ट्रातील कणकवली येथे गाडीसह कपिलला पकडले, त्याला थिवीला परत आणले आणि साथीदारांसह लाथा-बुक्क्यांनी व लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून त्याला जखमी अवस्थेत टाकून दिले. कपिलचा मृतदेह मिळाल्यावर, तांत्रिक तपासानंतर लवंदेला अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आर्लेकर, आरोलकर मला घाबरलेत! माजी मंत्री बाबू आजगावकरांचा हल्लाबोल; आमदारकीचा वापर लुटीसाठी केल्‍याचाही आरोप

Mopa Airport Taxi Protest: मोपा टॅक्सी आंदोलन प्रकरणी आमदार सरदेसाईंसह 54 जणांवर गुन्हे दाखल; 15 जूनला चौकशीसाठी पाचारण

Goa Politics: 'प्रभाग आरक्षणाचे निकष स्पष्ट करा, अन्यथा कोर्टात खेचू' सरदेसाईंचा सरकारला इशारा; पालिका निवडणुकीत 'रडीचा डाव' खेळू देणार नाही

Vagator Drug Case: वागातोर ड्रग्ज मृत्यू प्रकरणी हणजूण पोलिसांची इंदूरवारी! तपासात सहकार्य न करणाऱ्या मित्रांच्या रक्ताचे घेतले नमुने; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

सायबर फसवणुकीचे मोठे सिंडिकेट उद्ध्वस्त! 77 कोटींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश, 16 जणांच्‍या आवळल्‍या मुसक्‍या; गोव्‍यातून नऊजण ताब्‍यात

SCROLL FOR NEXT