Goa Politics: आर्लेकर, आरोलकर मला घाबरलेत! माजी मंत्री बाबू आजगावकरांचा हल्लाबोल; आमदारकीचा वापर लुटीसाठी केल्‍याचाही आरोप

Ajgaonkar Challenges Arlekar and Arolkar: पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर मला घाबरलेले आहेत. त्‍यामुळेच ते माझ्‍याविरोधात वक्तव्‍ये करीत आहेत, असे प्रत्युत्तर माजी मंत्री तथा पेडणेचे माजी आमदार बाबू आजगावकर यांनी केले.
Ajgaonkar Challenges Arlekar and Arolkar:
babu AjgaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर मला घाबरलेले आहेत. त्‍यामुळेच ते माझ्‍याविरोधात वक्तव्‍ये करीत आहेत, असे प्रत्युत्तर माजी मंत्री तथा पेडणेचे माजी आमदार बाबू आजगावकर यांनी केले. आर्लेकरांनी पेडण्‍याच्‍या विकासासाठी तसेच स्‍थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्‍यासाठी काहीही केले नाही. त्‍यामुळेच पेडणे गेल्‍या चार वर्षांत मागे पडला, असेही त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पेडणेचा लोकप्रतिनिधी या नात्‍याने मी २५ वर्षे काम केलेले आहे. तेथील जनतेला माझे काम माहीत आहे. त्‍यामुळेच त्‍यांच्‍याकडून मला पाठिंबा मिळत आहे. आर्लेकर आणि आरोलकर यांनी विकासकामाऐवजी राजकारण सुरू केले आहे. त्‍यामुळेच पेडणे आणि मांद्रे हे दोन्‍ही मतदारसंघ विकासाच्‍या बाबतीत मागे पडले आहेत. आर्लेकर आणि आरोलकर आता माझ्‍या वयावर येत आहेत. परंतु, माझ्‍या अनुभवाचा पेडणेतील जनतेला फायदा होणार हे माहीत असल्‍यानेच ते मला साथ देत आहेत, असे आजगावकर म्‍हणाले.

Ajgaonkar Challenges Arlekar and Arolkar:
Goa Politics: 'प्रभाग आरक्षणाचे निकष स्पष्ट करा, अन्यथा कोर्टात खेचू' सरदेसाईंचा सरकारला इशारा; पालिका निवडणुकीत 'रडीचा डाव' खेळू देणार नाही

आमदार प्रवीण आर्लेकर स्‍वत:ला ‘बिझनेसमन’ म्‍हणताहेत. त्‍यांचा कोणता ‘बिझनेस’ आहे, हे त्‍यांनी जनतेला सांगावे. मडगावात मी कुठे हप्‍ते घेतो, हेही त्‍यांनी सांगावे, असे आव्‍हान त्‍यांनी दिले. दरम्‍यान, जीत हे निवडणुकीआधी भूखंडांच्‍या रुपांतरणासाठी आलेले होते. त्‍यातून माझे त्‍यांच्‍याशी फिस्‍कटले. आर्लेकर, आरोलकर यांनी आमदारकीचा वापर लुटण्‍यासाठीच केला आहे, असेही आजगावकर म्हणाले.

Ajgaonkar Challenges Arlekar and Arolkar:
Goa Politics: आपल्याकडून विश्वासघात होणार नाही! काँग्रेस प्रवेशावेळी अमित पालेकरांनी नेत्यांना दिली ग्वाही

दोघांनाही समज देऊ!

बाबू आजगावकर आणि प्रवीण आर्लेकर हे दोघेही भाजपात असूनही त्‍यांच्‍यात शाब्‍दिक द्वंद्व पेटलेले आहे. याबाबत पत्रकारांनी मंगळवारी भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांना विचारले असता, आजगावकर आणि आर्लेकर यांना बोलावून घेऊन त्‍यांना समज देण्‍यात येईल, असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com