Pilgao farmers Dainik Gomantak
Video

Goa Pilgao Farmers: वेदांत वाहतूक रोखण्यासाठी पिळगाव शेतकरी आक्रमक

Pilgao Mining Dispute: डिचोलीत ‘वेदांता’च्या खनिज वाहतुकीविरोधात पिळगावमधील कोमुनिदाद आणि शेतकऱ्यांनी दंड थोपटले असून खनिज वाहतूक करू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Pilgao Mining Issue:

पिळगावमधील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही डिचोलीतील ट्रकमालक खनिज वाहतुकीस तयार झाले आहेत. खनिज वाहतुकीच्या मार्गावर काही दिवसांपूर्वी कोमुनिदाद आणि शेतकऱ्यांनी घातलेले काटेरी कुंपणही मशिनरीद्वारे मोडले. या प्रकाराची कुणकूण लागताच शेतकरी जमा झाले. शेतकऱ्यांनी खनिज वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांत धाव घेतली. कोणत्याही परिस्थीतीत खनिज वाहतूक करू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. महेश वळवईकर म्हणाले की, आमचा खाण व्यवसायास विरोध नाही. मात्र, शेती उद्ध्वस्त करून खाण व्यवसाय नको. खाण व्यवसायामुळे आमचे पूर्वज कसत असलेली शेती नष्ट झाली आहे. खाणमाती, गाळ साचून शेतजमिनी बुजल्या आहेत. त्यामुळे गेल्या बऱ्याच वर्षांपासून शेतजमीन पडीक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT