Goa Mining News Dainik Gomantak
Video

Pilgao Mining: SOP डावलून रात्रीची बेकायदा खनिज वाहतूक; 'वेदांता'विरुध्द उच्च न्यायालयात याचिका दाखल

Vedanta Illegal Mineral Transportation: गोवा खंडपीठाने शिरगाव वेदांता खनिज वाहतुकीसंदर्भात यापूर्वी दाखल असलेल्या मुलुख खाजन शेतकरी संघटना व गोवा फाऊंडेशनच्या जनहित याचिकेत निर्देश दिले होते.

Sameer Panditrao

Vedanta Illegal Mineral Transportation Pilgao

पणजी: शिरगाव येथील वेदांता खाण कंपनी ते सारमानस जेटीपर्यंत खनिज वाहतूक पिळगाव गावातील रस्त्यावरून रात्रीची वाहतूक केली जात आहे. या वाहतुकीसाठी खाण खात्याच्या ‘एसओपी’मध्ये त्याला परवानगी नाही तसेच त्यासाठी पर्यावरण परवानाही (ईसी) नाही, त्यामुळे ही खनिज वाहतूक बेकायदेशीर असल्याचा दावा बागवाडा - पिळगाव येथील एका स्थानिक नागरिकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केलेल्या अर्जात केला आहे. त्यावरील सुनावणी येत्या सोमवारी (१३ जानेवारी) होण्याची शक्यता आहे.

गोवा खंडपीठाने शिरगाव वेदांता खनिज वाहतुकीसंदर्भात यापूर्वी दाखल असलेल्या मुलुख खाजन शेतकरी संघटना व गोवा फाऊंडेशनच्या जनहित याचिकेत निर्देश दिले होते तसेच खाण खात्याने ही ‘एसओपी’ तयार केली होती. या निर्देशांचे पालन होत नसल्याने खंडपीठाने याचिकादाराला उच्च न्यायालयात अर्ज सादर करण्यास मुभा ठेवली होती त्यानुसार अनिल दत्ता सालेलकर यांनी हा अर्ज सादर केला आहे. शिरगाव येथील वेदांता कंपनीच्या खनिज मालाची वाहतूक पिळगाव गावातील वस्ती असलेल्या रस्त्यावरून केली जात आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होत असून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, तसेच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ट्रकांची वाहतूक होत असल्याने सुरक्षेचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. खाण कंपनीने गेल्या डिसेंबर महिन्यापासून रात्रीचीही खनिज वाहतूक सुरू केली आहे. खाण खात्याच्या एसओपीनुसार सकाळी ८ ते दुपारी १ व दुपारी २ ते ५.४५ पर्यंत वेळ वाहतुकीची ठरवून दिलेली आहे. मात्र, रात्री उशिरा वाहतूक सुरू आहे.

‘एसओपी’ बनवण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष

खंडपीठाने मूळ याचिकेत प्रदूषण नियंत्रण मंडळ, खाण खाते तसेच खाण कंपनीला खनिजवाहू ट्रकांच्या वाहतुकीसंदर्भात अनेक शिफारशी केलेल्या आहेत, मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत नाही. रात्री सुरू असलेल्या खनिजवाहू ट्रकांच्या फेऱ्या सुरूच असल्याने सरकारकडे त्यासंदर्भात पिळगाववासीयांनी समस्या मांडली. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. खंडपीठाने वेळोवेळी खाण खात्याला एसओपी तयार करण्याचे निर्देश दिले, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Tourism: नवीन धबधब्यांची ठिकाणे करणार खुली; दुर्घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी- डॉ. दिव्या राणे

Chicken Price Hike: भर उन्हाळ्यात ब्रॉयलर चिकनचे दर 'भडकले', किलोमागे 30 रुपयांनी वाढ; तरीही मागणी

खरी कुजबुज: शिवसेना वाटणार छत्र्या!

Goa Murder Case: बोटमालकाच्या खूनप्रकरणी दोन मजुरांना अटक, आगशी पोलिसांकडून चौकशी सुरू; खुनामागील कारण अजूनही अस्पष्ट

खुशखबर! राज्याच्या नद्यांतील प्रदूषण घटले, केवळ दोनच प्रदूषित नदीपट्टे; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सादरीकरण

SCROLL FOR NEXT