Pedne Punav Utsav Dainik Gomantak
Video

Pernem Punav Utsav: पेडणेतील प्रसिद्ध 'पुनव' उत्सव उत्साहात साजरा! पावसामुळे हिरमोड; भाविकांच्या संख्येवर परिणाम

Pernem News: पावसाच्या सावटाखाली येथील प्रसिद्ध ‘पुनव’ उत्सवाला प्रारंभ झाला. पण काल रात्रीपासून आज सकाळी नऊवाजेपर्यंत जोरदार पाऊस पडत राहिल्याने त्याचा परिणाम या ‘पुनव’ उत्सवावर झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Punav Utsav Pernem

पेडणे: पावसाच्या सावटाखाली आज येथील प्रसिद्ध ‘पुनव’ उत्सवाला प्रारंभ झाला. पण काल रात्रीपासून आज सकाळी नऊवाजेपर्यंत जोरदार पाऊस पडत राहिल्याने त्याचा परिणाम या ‘पुनव’ उत्सवावर झाला. एरवी दरवर्षी सकाळपासून श्री भगवती मंदिरात व श्री रवळनाथ मंदिरात देवांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागायच्या, पण यंदा कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे भाविकांची संख्या कमी होती.

श्रीदेवी भगवती मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण येत होते तसेच नवस केलेल्या भाविकांनी भाविका देवीची ओटी भरली व भाविकांना सुख समृद्धी देण्यासाठी भटजींनी गाऱ्हाणे घातले. आदिस्थान येथे सकाळपासून भजन व कीर्तन तसेच तुळाभार हा कार्यक्रम झाला. तुळाभार म्हणजे नवस केलेले कुटुंब ज्या व्यक्तीसाठी नवस केला होता, त्याला तराजूमध्ये एका बाजूने बसवतात व त्याचे वजन होईल तेवढे धान्य देवाला देतात.

मध्यरात्री जपली पारंपरिक प्रथा!

मध्यरात्री भूतपिशाच्च काढण्याचा पारंपरिक प्रथा जपण्याचा कार्यक्रम झाला. पहाटे वर्षपरंपरेनुसार श्री भूतनाथ व श्री रवळनाथ यांची तरंगे श्री भूतनाथाचे तरंग एका वातीत व एका रात्रीत आपले मंदिर बांधण्याची मागणी करणार असून श्री भूतनाथाला भक्तगण मंदिर बांधण्याचे आश्वासन दिल्यावर दोन्ही तरंगे श्री रवळनाथ मंदिरात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT