Pernem Accident Dainik Gomantak
Video

Pernem Accident: मद्यपी पर्यटकांच्या कारने दिली जोरात धडक, दोन्ही गाडीचे टायर फुटले; सेफ्टी बॅगमुळे एकजण जखमी

Agarwada Mandrem Junction Accident: पर्यटक कारने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या कारवर जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की त्यात दोन्ही गाड्यांचे टायर फुटले.

Sameer Panditrao

Pernem Agarwada Mandrem Junction Accident

मोरजी:आगरवाडा-मांद्रे जंक्शनजवळील श्री सातेरी मेडिकलजवळ दोन कारमध्ये अपघात होऊन दोन्ही गाड्यांचे टायर फुटले. धक्का इतका जबरदस्त होता की टायर फुटण्याच्या आवाजाने लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सविस्तर वृत्त असे की, जीए ०३ एन ७०३५ ही टॅक्सी मांद्रेहून म्हापशाच्या दिशेने जात होती. त्याचवेळी आगरवाड्याहून पेडणेच्या दिशेने जाणारी एमएच २० ईवाय ६७६६ या पर्यटक कारने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या कारवर जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की त्यात दोन्ही गाड्यांचे टायर फुटले.

पर्यटकांच्या गाडीतील फुगाही फुटला त्यामुळे गाडीत असलेल्या प्रवाशांना किरकोळ इजा झाली. दरम्यान, महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटक कारमध्ये पाचजण होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन केले होते. चालकही दारूच्या नशेतच गाडी चालवीत होता. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT