Morjim Beach Goa Dainik Gomantak
Video

Video: मोरजीच्या किनाऱ्यावर 'ऑलिव्ह रिडले'चे आगमन; 135 अंड्यांची नोंद

Turtle Nesting Video: गोव्याच्या किनारपट्टीवर सध्या 'ऑलिव्ह रिडले' कासवांच्या प्रजननाचा हंगाम उत्साहात सुरू असून, सकारात्मक बातम्या येत आहेत.

Akshata Chhatre

गोव्याच्या किनारपट्टीवर सध्या 'ऑलिव्ह रिडले' कासवांच्या प्रजननाचा हंगाम उत्साहात सुरू असून, उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही भागांतून सकारात्मक बातम्या येत आहेत. नाताळच्या रात्री दक्षिण गोव्यातील आगोंद किनाऱ्यावर एका कासवाने विक्रमी ४४१ अंडी घातली, तर दुसरीकडे उत्तर गोव्यातील मोरजी-टेंबवाडा किनाऱ्यावर या हंगामातील दुसऱ्या कासवाचे आगमन होऊन त्याने १३५ अंडी घातली आहेत.

वन विभागाने ही सर्व अंडी सुरक्षितपणे 'हॅचरी'मध्ये हलवली असून, गेल्या वर्षीच्या २०६ घरट्यांच्या विक्रमी आकड्याच्या पार्श्वभूमीवर यंदाची ही सुरुवात अत्यंत आशादायक मानली जात आहे. या सागरी पाहुण्यांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही किनाऱ्यांवर वन विभागाचे पथक तैनात करण्यात आले असून, पर्यटकांनाही शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नोकरीत बढती अन् तगडा आर्थिक लाभ! आजचा शुक्रवार ठरवणार तुमचे नशीब; कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ?

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

SCROLL FOR NEXT