Floating Jetty at Penha De Franca Dainik Gomantak
Video

Penha De Franca Jetty: पेन्हा दि फ्रँका येथे लवकरच तरंगती जेट्टी; स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार गती

Penha De Franca New Jetty: पेन्‍ह-द-फ्रांस येथे नवीन तरंगती जेटी बांधण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून त्यासाठीचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजुरीसाठी दिल्लीला पाठविण्यात आला आहे.

Sameer Panditrao

Penha De Franca New Floating Jetty

पणजी: पेन्‍ह-द-फ्रांस येथे नवीन तरंगती जेटी बांधण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून त्यासाठीचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजुरीसाठी दिल्लीला पाठविण्यात आला आहे. यामुळे स्थानिक मच्छीमार व ट्रॉलर मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यानंतर जेटीचा उपयोग करणे अधिक सोयीस्कर होणार असून यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.

हळर्णकर यांनी नुकतीच मालीम जेटीला भेट देऊन तेथील ट्रॉलर मालक व मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी ते म्हणाले, मालीम जेटी नव्याने बांधण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, परंतु सध्याच्या जेटीचा विस्तार करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (जीएसआयडीसी) मार्फत हे काम होणार आहे.

मालीम जेटीवरील स्थानिक मच्छीमार व ट्रॉलर मालकांना कचरा व्यवस्थापन आणि वीजपुरवठा समस्येचा सामना करावा लागत असून या समस्या लवकरच सोडवल्या जातील, असे आश्वासन मंत्री हळर्णकर यांनी दिले.

व्यवस्थापनात सुधारणा

कुटबण जेटीच्या व्यवस्थापनाबाबत मंत्री म्हणाले, जेटी बांधल्यानंतर ती भागीदारांना सुपूर्त केली जाते. त्यानंतर तिचे व्यवस्थापन करणे भागीदार संस्थांची जबाबदारी असते. त्यामुळे येथे स्वच्छता ठेवणे, हे त्या व्यवस्थापनाचे काम असते. मात्र, व्यवस्थापनात वाद निर्माण झाल्यास सरकार त्यात हस्तक्षेप करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025 Semifinal: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास 'या' संघाला मिळणार फायनलचं तिकीट, नियम वाचा

Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीसाठी 'बॅलेट पेपर'चा वापर, पाच कोटींचा होणार खर्च; मतदारयादीत नवी नावे जोडणे स्थगित

Goa Politics: 'माझे घर'ला 'खो' घालण्याचा यत्न, विरोधी आमदारांना धडा शिकवा; CM प्रमोद सावंतांचे जनतेला आवाहन

Bihar Elections: "मंचावर येऊन नाचायला सांगा ते नाचतील..." विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

SCROLL FOR NEXT