New Academic Year Goa Dainik Gomantak
Video

Goa School Reopening: राज्यात शैक्षणिक वर्षाला विद्यार्थ्यांचा पूर्ण प्रतिसाद; पालकांचा विरोध कायम

Goa Education: राज्यातील सर्वच भागातील शाळा आज सकाळपासून गजबजल्या. सर्व शाळांमध्ये आज सरासरी ९० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Sameer Panditrao

पणजी: शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एप्रिलमध्ये इयत्ता सहावी ते बारावी (अकरावी वगळून) नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरवात झाली. राज्यातील सर्वच भागातील शाळा आज सकाळपासून गजबजल्या. सर्व शाळांमध्ये आज सरासरी ९० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

शिक्षण संचालनालयाबाहेर पालकांची निदर्शने

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात करताना काही पालकांनी शिक्षण संचालनालयाबाहेर एकत्र येत विरोध केला. यासंबंधी सांगताना पालक सिसील रॉड्रीगीस म्हणाल्या, की आम्हा पालकांना विश्‍वासात घेतले नाही. आमचे मुद्दे मांडण्यासाठी बैठक घेण्यासंबंधीचे आश्‍वासन शिक्षण सचिवांनी दिले होते, परंतु ते आश्‍वासन पाळण्यात आले नाही. आमचा एनईपीला विरोध नाही, परंतु ज्याप्रकारे त्याची अंमलबजावणी केली जाते, ती योग्य नाही. त्यामुळे आम्ही विरोध करत आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असल्याने हा निर्णय योग्य नाही.

राज्यात शाळा चांगल्या प्रकारे सुरू आहेत. सर्वांचा प्रतिसादही चांगला लाभत आहेत. सर्व शाळांना एससीईआरटीमार्फत पुस्तके पोहोचली आहेत. तरी देखील शिक्षण संचालनालयासमोर आंदोलन, मोर्चा आदी प्रकार करणे गैर आहे. जर या पालकांना निवेदन द्यायचे असेल तर ते देऊ शकतात, परंतु असे प्रकार होता कामा नये.
शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: म्हापशात अज्ञाताने जाळल्या 6 कचराकुंड्या; पालिकेची पोलिसांत तक्रार

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतं? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

WCL 2025: युवराज सिंग, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल... क्रिकेटचे लीजेंड्स पुन्हा मैदानात; LIVE सामने कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Astronomer CEO Viral Video: सीईओ-एचआर हेडचं अफेअर उघड! कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये तिला मिठी मारली नंतर... पाहा व्हिडिओ

Cuncolim Indoor Stadium: कुंकळ्ळीतील इनडोअर स्टेडियमची दुर्दशा, त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT