Nachinola House Fire Dainik Gomantak
Video

Nachinola House Fire: नास्नोळा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, 5 लाखांचे नुकसान

Nachinola House Fire: गोव्यातील नास्नोळा परिसरात एका घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले.

Manish Jadhav

गोव्यातील नास्नोळा परिसरात एका घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले असून, अंदाजे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण घरातील सर्व सदस्य वेळीच बाहेर पडले होते. स्थानिक रहिवासी दिनेश नाईक यांच्या घरात शनिवारी (18 मे) संध्याकाळी ही घटना घडली. अचानक त्यांच्या घरातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना पाहून शेजाऱ्यांनी तातडीने आरडाओरडा सुरु केली. आगीची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी आग विझवण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरु केले, पण आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. आग इतक्या वेगाने पसरली की, घरातील वस्तू बाहेर काढण्यासाठीही वेळ मिळाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT