Mormugao Dainik Gomantak
Video

Mormugao: मुरगांव पालिकेन अवैद्य दुकनां केली सील

MMC Sealed Shops: व्यापार परवाना न घेता तसेच भाडे थकबाकी न भरणाऱ्या आस्थापनांविरोधात मुरगाव पालिकेने मोहीम सुरू केली आहे.

Sameer Panditrao

वास्को: व्यापार परवाना न घेता व्यवसाय सुरू करणाऱ्या एका व्यायसिकाच्या दुकानाला मुरगाव पालिकेने सोमवारी सील ठोकले. व्यापार परवाना न घेता तसेच भाडे थकबाकी न भरणाऱ्या आस्थापनांविरोधात मुरगाव पालिकेने मोहीम सुरू केली आहे.

काही आस्थापनांना भाडे थकबाकी भरण्यासाठी तसेच व्यापार परवान्यांचे नूतनीकरण करण्यासंबंधी नोटिसा दिल्या आहेत. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास त्यांच्या आस्थापनांना सील ठोकण्यात येईल, असे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी सांगितले. पालिकेकडून व्यापार परवाना न घेता किंवा घेतलेल्या परवान्याचे नूतनीकरण न करता येथे काही व्यावसायिक व्यवसाय करतात. काहीजण आपल्या व्यवसायामध्ये बदल करताना नवीन व्यापार परवाना न घेता बिनदिक्कतपणे व्यवसाय सुरू करतात. आपले दुकान चकाचक करण्यासाठी लाखो रुपये खर्च करणारे काही व्यावसायिक व्यापार परवाना घेण्याची तसदी घेत नाही. येथील काही पेट्रोल पंपमालकांनी आपल्या लीज कराराची प्रत पालिकेला दिली नाही. तसेच काहीजणांनी नवीन भाडेदरानुसार भाडेपट्टी भरली नाही. त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांनी या गोष्टींची पूर्तता केली नाही, तर त्या पेट्रोल पंपांनाही सील ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT