Morjim Accident Dainik Gomantak
Video

Morjim Accident: समोरासमोर गाड्या आल्या, दोन्ही युवक कोसळले; मोरजीतील अपघाताचे CCTV Footage पहा

Morjim New Waddo Accident: मोरजी पंचायत क्षेत्रातील न्यूवाडा मुख्य रस्त्यावर सकाळी ८ वा.च्‍या सुमारास बुलेट आणि ॲक्टिवा दुचाकी यांच्‍यात समोरासमोर अपघात होऊन दोन युवक जखमी झाले.

Sameer Panditrao

मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रातील न्यूवाडा मुख्य रस्त्यावर सकाळी ८ वा.च्‍या सुमारास बुलेट आणि ॲक्टिवा दुचाकी यांच्‍यात समोरासमोर अपघात होऊन दोन युवक जखमी झाले. या अपघातात भाटीवाडा येथील साहिल शेटगावकर व प्रीतेश हरमलकर (गावडेवाडा-मोरजी) हे दोघेही

गंभीर जखमी झाले असून त्‍यांच्‍यावर बांबाेळी येथील गोमेकॉत उपचार सुरू आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांकडून अपघाताची नोंद घेऊन, प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

दरम्‍यान, सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. रस्त्यांचे रुंदीकरण झाले तरी बेशिस्‍त पार्किंगमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT