Piligaon Gram Sabha Faces Heated Debate on Mining and Waste
डिचोली: कचरा प्रश्न आणि खनिज वाहतुकीच्या मुद्यावरून पिळगाव पंचायतीची आजची ग्रामसभा वादळी ठरली. कचरा प्रश्नावर ग्रामस्थांनी आक्रमक होत, ही समस्या त्वरित सोडविण्यासाठी पंचायत मंडळाने पावले उचलावीत अशी जोरदार मागणी केली. खनिज वाहतुकीच्या मुद्यावरून ग्रामस्थांनी उपसरपंचांना ‘टार्गेट’ करून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी वातावरण काहीसे तंग झाले होते.
सरपंच मोहिनी जल्मी यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. यावेळी उपसरपंच सुनील वायंगणकर यांच्यासह उमाकांत परब गावकर, सोनिया बेतकीकर, चेतन खोडगिणकर, शर्मिला वालावलकर आणि स्वप्निल फडते हे सर्व पंच सदस्य उपस्थित होते. निरीक्षक म्हणून मोहन सामंत उपस्थित होते. सरपंच मोहिनी जल्मी यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिवांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही ग्रामसभा दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत चालली. जयेश वालावलकर, संदेश गोवेकर, गोकुळदास गावस, अनिल सालेलकर, दिलीप गावस, देविदास प्रभुगावकर आदी ग्रामस्थांनी चर्चेत भाग घेतला. जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत यांनीही ग्रामसभेला उपस्थिती लावली होती.
पिळगाव - सारमानसमार्गे खनिज वाहतुकीवर नियंत्रण नाही. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नाही, असा दावा ग्रामस्थांनी केला. रस्त्यावर खनिज सांडत आहे. मात्र, त्यावरील उपाययोजनेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, असा दावा करून खनिज वाहतुकीवर नियंत्रण आणा, अशी मागणी नागरिकांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.