Black Panther: गोव्यात ‘ब्लॅक पँथर’चा दरारा! कुडणेत संचार; बोरी परिसरात दोघांच्या वावराने वाढली भिती Video

Black Panther Goa Sighting: सतीचेभाट कुडणे साखळी येथील क्रीडा मैदानाच्या बाजूलाच सोमवारी सकाळी गणेश मळीक या युवकाला ‘ब्लॅक पॅंथर’ चे दर्शन घडले.
Black Panther goa
Black Panther goaDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: सतीचेभाट कुडणे साखळी येथील क्रीडा मैदानाच्या बाजूलाच सोमवारी सकाळी गणेश मळीक या युवकाला ‘ब्लॅक पॅंथर’ चे दर्शन घडले. मैदानावर धावत असताना अचानक कुत्र्यांनी झाडीच्या दिशेने वेग धरला व ते जोरात भुंकू लागले. कुत्र्यांच्या भुंकण्याने ब्लॅक पॅंथर जवळच असलेल्या एका झाडावर जाऊन बसला.

डिचोली तालुक्यात यापूर्वी ब्लॅक पॅंथरचे दर्शन झाल्याचे कधी ऐकिवात नव्हते. परंतु, सोमवारी सकाळीच झालेल्या या ब्लॅक पॅंथरच्या दर्शनामुळे आता लोकवस्तीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या २०१२ पासून कुडणे व परिसरातील खाण व्यवसाय हा पूर्णपणे बंद होता.

आता काही दिवसांपूर्वी करमळेवाडा कुडणे येथील खाण व्यवसाय सुरू झाल्याने पुन्हा जंगल भागात मोठा आवाज व गाड्यांची रहदारी सुरू झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्राणी दुसऱ्या भागात स्थलांतर होत आहेत.

Black Panther goa
Dodamarg: दोडामार्गमध्ये ‘बाहुबली’-‘गणेश’ हत्तींमध्ये जुंपणार युद्ध? केर परिसरात 7 हत्तींचा वावर; वनविभागासमोर मोठे आव्हान

मिरंगातही भीती

मिरंगात (बोरी) परिसरात दोन ब्लॅक पॅंथरचा वावर वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. बोरी पंचायत क्षेत्रातील मिरंगात हा दुर्गम परिसर असून या डोंगराळ भागात दाट झाडे झुडपे आहेत. मिरंगात परिसरातून बेतकीपर्यंत अंतर्गत रस्ता जातो.

Black Panther goa
Goa Leopard Attack: गोव्यात बिबट्याचा थरार! चरावणे येथे 59 वर्षीय वृद्धाचा हल्ल्यात मृत्यू

या रस्त्यावर हे ब्लॅक पॅंथर फिरताना काहीजणांनी पाहिले. बोरीच्या प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर नित्यनियमाने वाहतूक कोंडी झाल्यावर अनेक वाहनचालक बोरी पुल बेतकी मिरंगातील रस्त्यावरून वाहने देऊळवाडा मार्गे टॉपकोलाहून फोंड्याला जातात. या रस्त्यावरच हे ब्लॅक पॅंथर लोकांना फिरताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com