Mayem Farmers Dainik Gomantak
Video

Mayem Farmers: 2013 पासूनची भरपाई त्वरित द्या! मयेतील शेतकऱ्यांची मागणी; पहा Video

Mining compensation Mayem: खाण कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या बॅनरखाली मयेतील शेतकरी पुन्हा एकदा संघटित झाले आहेत.

Sameer Panditrao

Mayem Farmers Protest

डिचोली: खाण कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या बॅनरखाली मयेतील शेतकरी पुन्हा एकदा संघटित झाले आहेत. आमच्‍या सहनशीलतेचा अंत न पाहता, प्रलंबित नुकसान भरपाई त्वरित द्या. सरकारनेही याप्रश्नी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

संबंधित खाण कंपनीकडून २०१३ पासूनची नुकसान भरपाई कधी मिळणार, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. नुकसान भरपाई देण्यास खाण कंपनीकडून टाळाटाळ होत आहे, असा या शेतकऱ्यांचा दावा आहे. किसान सभेचे मये विभागाचे अध्यक्ष कृष्णा गडेकर, कामगार नेते व्हिक्टर ब्रागांझा आणि नारायण खराडे यांच्या नेतृत्वाखाली मये येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी महिला मिळून ३० च्या आसपास शेतकरी उपस्थित होते.

सरकारने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. अशी मागणी कृष्णा गडेकर आणि नारायण खराडे यांनी केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यांना अन्य पर्याय स्वीकारावा लागेल. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. खनिज व्यवसायाला शेतकऱ्यांचा विरोध नाही, मात्र नुकसानीतून सावरण्यासाठी प्रलंबीत नुकसान भरपाई मिळायलाच हवी, अशी मागणी राजेंद्र नाईक आणि दत्ताराम कुडासकर यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना २.७० कोटींची भरपाई

तत्कालीन सेसा खाण कंपनीकडून २०१० ते १३ या चार वर्षांची मयेतील ६०० शेतकऱ्यांना २.७० कोटींची नुकसान भरपाई दिली आहे. त्यानंतर नुकसान भरपाईसंदर्भात सेसाकडून कोणतीही विनंती करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर २०१३ पासून सेसा किंवा वेदांताकडून मये परिसरात खनिज व्यवसाय केलेला नाही. तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही, असे वेदांता कंपनीने मयेतील शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात बाजू मांडताना स्पष्ट केले आहे.

खाणींमुळे शेती, बागायती धोक्‍यात

खनिज व्यवसायामुळे मयेतील शेती, बागायती पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे या पिकांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आदेश असतानाही नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ होत आहे, अशी खंत कृष्णा गडेकर यांनी व्यक्त केली. नव्याने खाण व्यवसाय सुरू करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात येईल. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात शेतकरी हक्काची नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत, असे गडेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Garden: काँक्रिटच्या विळख्यात पणजीची हिरवाई जपणारं एक अद्भूत स्थान; 'जार्दिम गार्सिया द ओर्ता'

Pakistan ODI Cricket Record: वनडे क्रिकेटमधील लाजिरवाणा रेकॉर्ड; एकाच डावात 6 फलंदाज 'डक'वर आऊट, क्रिकेट विश्वात पाकड्यांची पुन्हा नाचक्की

Crime News: 15 व्या वर्षी लग्न, दोनदा तीन तलाक अन् हलालाचा 'नरक'! लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हाय कोर्टाने ओढले ताशेरे; म्हणाले, 'अशा प्रथा...'

Shukra Chandra Yuti 2026: 16 जुलैला आकाशात महासंयोग! शुक्र-चंद्राची युती 'या' 5 राशींना बनवणार करोडपती; लव्ह लाईफमध्येही मिळणार गूड न्यूज

PF New Rules Update: एक चुकीचा निर्णय अन् निवृत्तीचा फंड धोक्यात! इपीएफओचा नवा 1800 रुपयांचा नियम; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT