Margao Police Ganja Seizure Dainik Gomantak
Video

गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 4 लाखांचा गांजा जप्त, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Margao Police Ganja Seizure: गोव्यात अमली पदार्थांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या असून, मडगाव पोलिसांनी नावेली येथे केलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे.

Sameer Amunekar

गोव्यात अमली पदार्थांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या असून, मडगाव पोलिसांनी नावेली येथे केलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. या कारवाईत म्हापसा येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल 4 किलो गांजा जप्त करण्यात आला. या अमली पदार्थाची अंदाजे बाजारपेठेतील किंमत 4 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नावेलीम परिसरात विशेष कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान संशयिताच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक केली. आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. प्राथमिक तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत आरोपीची सखोल चौकशी करून अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा तपास केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT