Digambar Kamat | Moti Dongar Fort Dainik Gomantak
Video

Moti Dongor: 'मोती डोंगर'बाबत काय म्हणाले दिगंबर कामत? पहा...

गोमन्तक डिजिटल टीम

पोलिस चौकीमुळे मोतीडोंगर परिसरात आता शांतता नांदेल, शिवाय बाहेरून जे लोक येऊन येथे दंगामस्ती करतात त्यांच्यावर पोलिसांचा दरारा राहील. मोतीडोंगर हा चांगल्या कामासाठी ओळखावा यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

विजयादशमीच्या दिवशी मोतीडोंगरावरील नव्यानेच बांधलेल्या पोलिस चौकीचे उद्‌घाटन मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, नगरसेवक सगुण नायक, दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत, पोलिस अधीक्षक संतोष देसाई, पोलिस अधीक्षक (वाहतूक) प्रबोध शिरवईकर, पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक, निवृत्त अभियंता प्रसाद पाणंदीकर, समाज कार्यकर्ते योगीराज कामत उपस्थित होते.

‘लोकांनी सहकार्य करावे’

दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सांवत यांनी सांगितले की, येथे पोलिस चौकीची अत्यंत आवश्यकता होती व पोलिस त्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून प्रयत्नशील होते. लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे. काही वाईट प्रवृत्ती आढळल्यास लगेच पोलिसांच्या निदर्शनास आणून देणे ही लोकांची जबाबदारी आहे व आमिषांना बळी पडू नका.

याच चौकीत तक्रारी द्या!

या पोलिस चौकीत एक साहाय्यक उपनिरीक्षक, एक हवालदार, तीन पोलिस, एक-दोन होमगार्ड व एक मोटारसायकल पायलट तैनात केले जातील. बारीक सारीक तक्रारीसाठी मडगाव पोलिस स्थानकात लोकांनी येण्याची गरज नाही. मोतीडोंगर येथील पोलिस चौकीतच तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhas Velingkar Controversy: गोमंतकीयांना 'शांतता' हवी! ‘गोंयकार’पण म्हणजे काय, हे समजून घेणे अतिशय गरजेचे

Rent Bike In Goa: आम्हालाही ‘रेंट बाईक’चा परवाना द्या! खासगी दुचाकीधारकांची मागणी

FC GOA साठी आनंदाची बातमी! 'हे' दोन खेळाडू तंदुरुस्त; पुढचा सामना मुंबई सिटीविरुद्ध

Maryam Nawaz: ''प्लीज मदत करा...''; जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी मरियम नवाझ यांची भारताला हाक!

Vinoo Mankad Trophy: गोव्याचा 'विनू मांकड स्पर्धे'तील मोहिमेचा विजयाने समारोप; चंडीगढवर ४० धावांनी मात

SCROLL FOR NEXT