Margao Master Plan Dainik GOmantak
Video

Margao: मडगाव 'मास्टर प्लॅन'ची चर्चा संपली गदारोळात! नागरिकांकडून आक्षेप

Margao Master Plan: प्रत्‍येक प्रभागात जाऊन प्रत्‍यक्ष सर्वेक्षण केले जाईल आणि नागरिकांच्‍या हरकती आणि सूचना लक्षात घेतल्‍यानंतरच या आराखड्याला अंतिम स्‍वरूप दिले जाईल, असे आश्‍वासन या अधिकाऱ्यांना लोकांना द्यावे लागले.

Sameer Panditrao

मडगाव: मडगावच्‍या नियोजित मास्टर प्‍लॅन आराखड्यावर चर्चा करण्‍यासाठी आज बोलावलेली बैठक गदारोळातच संपली. हा मास्‍टर प्‍लॅन तयार करण्‍यासाठी ज्‍या एजन्‍सीला काम दिले हाेते, त्‍या एजन्‍सीने शहरात कुठेही प्रत्‍यक्षात न फिरता केवळ शहराचा बाह्यविकास आराखडा समोर ठेवून हा आराखडा तयार केल्‍याचे आज स्‍पष्‍ट झाले.

नागरिकांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांची समर्पक अशी उत्तरे संबंधित अधिकारी देऊ शकले नाहीत. यावेळी या अधिकाऱ्यांच्‍या मदतीला धावून आलेले मडगावचे नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांनाही नागरिकांच्‍या रोषाला सामोरे जावे लागले.

शेवटी प्रत्‍येक प्रभागात जाऊन प्रत्‍यक्ष सर्वेक्षण केले जाईल आणि नागरिकांच्‍या हरकती आणि सूचना लक्षात घेतल्‍यानंतरच या आराखड्याला अंतिम स्‍वरूप दिले जाईल, असे आश्‍वासन या अधिकाऱ्यांना लोकांना द्यावे लागले.हा मास्‍टर प्‍लॅन तयार करण्‍याचे काम ‘स्‍टुडिओ पॉड’ या एजन्‍सीला देण्‍यात आले असून या एजन्‍सीने तयार केलेला आराखडा वस्‍तुस्‍थितीवर आधारित नाही, अशी हरकत यावेळी घेण्‍यात आली. मडगावच्‍या बाह्य विकास आराखड्याला काहीजणांनी हरकत घेऊन याविरोधात न्‍यायालयात धाव घेतलेली आहे. त्‍यामुळे हा बाह्यविकास आराखडाच विवादित बनलेला आहे. असे असताना या आराखड्यावर आधारून मास्‍टर प्‍लॅन आराखडा कसा तयार केला, असा प्रश्‍न नागरिकांनी विचारला असता, संबंधित अधिकारी निरुत्तर झाले. गुरुवारी या मास्टर प्लॅनचे पालिका सभागृहात पॉवर पॉइंट सादरीकरण झाले असता, उपस्थित नागरिकांनी या त्रुटी उघडकीस आणून, नागरिकांची मते जाणून न घेता निर्णय कसा घेतला जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सरकारी अधिकाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला, लंडनला गेला पळून; वर्षभराने संशयिताला कलकत्त्यात अटक

Codar: "देवा राखणदारा, IIT Project फाटी घें" कोडार ग्रामस्थांनी देवाला घातले ‘गाऱ्हाणे’; सरपंचाच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा इशारा

Viral Video: 'तडपाओगे तडपा लो...!’ चिमुकलीनं गायलं लतादीदीचं गाणं, क्यूटनेसनं जिंकली नेटकऱ्यांची मनं; सोशल मीडियवर धूमाकूळ

Makharotsav in Goa: 16व्या शतकातील परंपरा, पोर्तुगीज आक्रमणातून वाचलेल्या मूर्तींचा अनोखा उत्सव; देवीच नाही तर भैरवाचाही भरतो 'मखरोत्सव'

Sattari Crime: बिहारच्या व्यक्तीवर गोव्यात अज्ञाताकडून गोळीबार, सत्तरीतील धक्कादायक घटना; परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT