Ponda Robbery  Dainik Gomantak
Video

Kundaim Theft: दोन दिवस रेकी, असा रचला कट; 'कुंडई' लुटमार प्रकरणाचा अखेर उलगडा Watch Video

Kundaim Theft News: कुंडई प्रकरणी पाचजणांना अटक केली असून चोरीला गेलेल्या दीड लाख रुपयांपैकी सव्वालाखाची रक्कम जप्त केली आहे. हा कट अमलात आणताना संशयितांनी दोन दिवस आधी त्या जागेची रेकी केल्याचे उघड झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kundaim Industrial Estate Theft

मडगाव: कुंडई औद्योगिक वसाहतीत सहा दिवसांपूर्वी जो जबरी चोरीचा प्रकार घडला, तो एक सुनियोजित कट होता. कुंडई येथील ‘आय. जी. इंटीरियर’ या कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला असलेला चतुर्भुज घिंटल हा रोज आपल्या स्कूटरच्या डिकीत मोठ्या प्रमाणावर रोकड घेऊन फिरतो याची माहिती संशयितांना होती. त्यामुळे त्याला लुटून मोठा डल्ला मारण्याचा डाव त्यांनी आखला होता. पण त्या दिवशी त्याच्या डिकीत फक्त दीड लाख रुपये होते. या प्रकरणी दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कटाची माहिती दिली. आत्तापर्यंत या प्रकरणी पाचजणांना अटक केली असून चोरीला गेलेल्या दीड लाख रुपयांपैकी सव्वालाखाची रक्कम जप्त केली आहे. हा कट अमलात आणताना संशयितांनी दोन दिवस आधी त्या जागेची रेकी केल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणात यापूर्वी म्हार्दोळ पोलिसांनी पवन यादव (वास्को) आणि नागराज तलवार (वास्को) यांना अटक केली होती. त्यानंतर काल रात्री अशोक पांढरेकर (मालभाट-मडगाव, मूळ कारवार) राजू बसवराज वडार (केपे, मूळ कर्नाटक) आणि राजू रेगी (मांगूरहिल) यांना अटक केली. आज त्यांना फोंडा न्यायालयात हजर केले असता चार दिवसांच्या पोलिस कोठडीचा रिमांड देण्यात आला.

सदर घटना ९ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली होती. चतुर्भुज घिंटल हा दुपारी जेवण करण्यासाठी कुंडई आयडीसीमधून बाहेर पडला असता त्याची वाट पाहत एका कारमध्ये बसलेल्या दोन अज्ञातांनी त्याला अडविले व त्याच्या डोळ्यात तिखट स्प्रे मारून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या डोळ्यावर गॉगल असल्याने स्प्रे त्याच्या डोळ्यात जाऊ शकला नाही. तरीही त्‍यांनी दीड लाख पळविलेच.

अशोक पांढरेकर मुख्य सूत्रधार

मडगाव येथे एक स्क्रॅप अड्डा चालविणारा अशोक पांढरेकर हा या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. तो कुंडई येथील त्या कंपनीला स्क्रॅप माल पुरवायचा. त्‍याला चतुर्भुजच्‍या कामाची माहिती होती. त्याने लुटीचा डाव आखला व त्‍यासाठी राजू वडार, राजू रेगी यांच्याशी संपर्क साधला. रेगी हा पूर्वीपासून गुन्हेगारी प्रकरणांत आहेच. त्‍यानेच या कामासाठी पवन आणि नागराज यांना तयार केले. तसेच ७ ऑक्टोबर रोजी त्यांनी कुंडई औद्योगिक वसाहतीत जाऊन रेकी केली होती. चतुर्भुज याला कोठे अडवता येणे शक्य आहे. ती जागा हेरून ९ रोजी पवन आणि नागराज गाडी घेऊन दबा धरून बसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT