Sadetod Nayak  Dainik Gomantak
Video

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Datta Nayak on Romi Konkani: मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे की, रोमी कोकणी आणि मराठी यांच्यातील वाद थांबला पाहिजे. मराठी व रोमी कोकणीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळायला हवा, असे मत कट्टर कोकणी समर्थक दत्ता नायक यांनी ‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ या चर्चेत व्यक्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Datta Nayak About Romi Konkani

पणजी: मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे की, रोमी कोकणी आणि मराठी यांच्यातील वाद थांबला पाहिजे. मराठी व रोमी कोकणीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळायला हवा, असे मत कट्टर कोकणी समर्थक दत्ता नायक यांनी ‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ या चर्चेत व्यक्त केले.

‘गोमन्तक टीव्ही’वरील गुरुवारी सायंकाळी झालेल्या ‘सडेतोड नायक’ या चर्चात्मक कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी ‘कुठे चालला आपला गोवा?’ या विषयाच्या अनुषंगाने कोकणी साहित्यिक, विचारवंत, उद्योजक दत्ता नायक, माजी केंद्रीय कायदामंत्री तसेच मराठी साहित्यिक ॲड. रमाकांत खलप आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. क्लिओफात कुतिन्हो आल्मेदा यांच्याशी चर्चा केली.

सुरवातीला ॲड. खलप म्हणाले, गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात विलीनीकरण नको म्हणून ठरविले होते, परंतु आजची स्थिती पाहिल्यास संपूर्ण गोव्याचे विलीनीकरण संपूर्ण देशातच नव्हे, तर विदेशातही झाले आहे. विधानसभेत आम्ही एक दुरुस्ती विधेयक मांडले होते की, कोकणीचे प्रमाणीकरण करूया. गोवन कोकणी ही विविध भाषांची मिळून बनली आहे. ती गोव्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. पेडण्यात वेगळी बोलली जाते, सासष्टीत वेगळी बोलली जाते, ख्रिस्ती नागरिक वेगळ्या पद्धतीने कोकणी बोलतात. कोकणीला सर्वमान्य अशी लिपीही नाही. त्यामुळे सर्वमान्य कोकणी भाषा ठरविण्यासाठी प्राधिकरण नेमावे. कोकणी रोमी आणि मराठीला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्व गोमंतकीयांनी एकत्र आले पाहिजे.

कोकणी साहित्यिक दत्ता नायक म्हणाले, एक म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तमिळनाडूचे उदाहरण घेऊन एक वेगळे जनमत कौल घेण्याची गरज होती, ती संधी गमावली. दुसरे म्हणजे कोकणी एक माध्यम धरून शिवसेनेसारखी ‘कोकणी सेना’ असे स्वतंत्र संघटन स्थापन करण्याची गरज होती, ते झाले नाही. देशात सर्वत्र लेखक, विचारवंत दिशा ठरवतात. मात्र, गोव्यात राजकारणी दिशा ठरवतात आणि त्याचे अनुकरण जनता करत आली आहे, असे चित्र गेल्या ६० वर्षांत राज्यात निर्माण झाले आहे.

ॲड. क्लिओफात कुतिन्हो आल्मेदा म्हणाले, माझ्या मते, एका भाषेच्या तीन लिप्या असून त्या लिपीवाद्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. ज्यात देवनागरी, कन्नड आणि रोमीचा समावेश आहे. मराठीला अपेक्षेनुरूप समान आणि पुरेसा दर्जा आहे. ज्यावेळी गोमंतकीय नागरिक रोजगारासाठी गोव्याबाहेर गेले, तसेच गोव्यात येणाऱ्या स्थलांतरितांचीही संख्या वाढत गेली. त्यामुळे स्थलांतरित गोव्यात येणे हे अपेक्षितच होते.

भाषावाद सोडून गोवा वेगळ्याच वाटेवर

दत्ता नायक म्हणाले की, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, युनायटेड गोवन्स या प्रादेशिक पक्षांनी भाषा वाद मिटवून गोव्याची स्वतंत्र अस्मिता टिकविण्याची संधी गमावली. या पक्षांनी एकत्रित विचार करून वाद मिटविणे तेव्हा शक्य होते. आज भाषा वादावरून भांडत असताना गोवा वेगळ्याच दिशेने जात असल्याचे चित्र दिसत आहे. ते पालटले पाहिजे.

आता हे सर्व थांबवा...

परप्रांतीयांना आम्हीच गोव्यात या असे आमंत्रण देऊन कॅसिनो आणा, जुगार खेळा असे सांगत आहोत. गोव्याचा माणूस बाजारात दिसेनासा झाला आहे. व्यसन एकटे येत नाही, ते अनेकांना घेऊन येते. सगळी धोरणे फोल ठरली आहेत. कॅसिनो म्हणून तुम्ही गोव्याला कुठे घेऊन जाणार आहात, आता हे सर्व थांबवा असे म्हणण्याची वेळ आली आहे, असे खलप म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT